व्हिडीओ होतोय व्हायरल; भारत जोडो यात्रेत राहुल गांधींची मुलांबरोबर शर्यत

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला (Bharat Jodo Yatra) तब्ब्ल ५० दिवस पूर्ण झाले आहेत. कॉंग्रेस खासदार राहुल गांधी (Congress MP Rahul Gandhi) सतत भारत जोडो यात्रेशी जोडले जात आहेत. सध्या ही यात्रा तेलंगणात आहे.

व्हिडीओ होतोय व्हायरल; भारत जोडो यात्रेत राहुल गांधींची मुलांबरोबर शर्यत

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला (Bharat Jodo Yatra) तब्ब्ल ५० दिवस पूर्ण झाले आहेत. कॉंग्रेस खासदार राहुल गांधी (Congress MP Rahul Gandhi) सतत भारत जोडो यात्रेशी जोडले जात आहेत. सध्या ही यात्रा तेलंगणात आहे. राहुल गांधींनी रविवारी गोलापल्ली जिल्ह्यातून तेलंगणातील प्रवासाला सुरुवात केली. या यात्री दरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओमध्ये राहुल गांधी मुलांबरोबर धावताना दिसले आहेत. या व्हिडीओमध्ये काँग्रेस कार्यकर्तेही धावताना दिसत आहेत.

कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी यात्रेदरम्यान लहान मुलांशी संवाद साधला. त्यानंतर ते अचानक मुलांबरोबर धावू लागले. असे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. याबरोबरच त्यांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेले जवानही धावू लागतात. भारत जोडो यात्रेच्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे.

शनिवारी महबूबनगर जिल्ह्यातील भारत जोडो यात्रेदरम्यान त्यांनी आदिवासी कलाकारांच्या गटाशी हस्तांदोलन केले. आदिवासी टोपी घालून कॉंग्रेस खासदार राहुल गांधी आदिवासींबरोबर पारंपारिक नृत्यात सामील झाले आणि पक्षाचे नेते तसेच यात्रेतील इतर सहभागींचा उत्साह वाढवला. तेलंगणामध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा आज पाचवा दिवस आहे.

हे ही वाचा :

आमदार कैलास पाटलांचे ७व्या दिवशी उपोषण मागे

जरी शिंदेंसोबत असलो तरी, मिलिंद नार्वेकरांबद्दल वाईट चितलं जाणार नाही – उदय सामंत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version