spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ज्या प्रकारे त्यांची प्रकरणे बाहेर येत आहेत, यांना भाजप तर टाचणी लावत नाही ना? उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला सवाल

''ज्या प्रकारे त्यांची प्रकरणे बाहेर येत आहेत, यांना भाजप तर टाचणी लावत नाही ना? ही बरोबर त्याच मंत्र्यांची कशी येत आहे. हा विचार त्यांनी केला पाहिजे.''

शिंदे-फडणवीस सरकारविरोधात मोर्चे करत महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) सरकारमधील एकामागून एक शिंदेगटातील तीन मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. पण आतापर्यंत बाहेर आलेल्या प्रकारणांपैकी सर्व मंत्र्यांची प्रकरणे बाहेर आणण्यात भाजपचा (BJP) तर हात नाही ना? असा प्रश्न आता ठाकरे गटाचे नेते करत आहे. यावरच बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले आहेत की, ”ज्या प्रकारे त्यांची प्रकरणे बाहेर येत आहेत, यांना भाजप तर टाचणी लावत नाही ना? ही बरोबर त्याच मंत्र्यांची कशी येत आहे. हा विचार त्यांनी केला पाहिजे.” पुढे ते म्हणाले, ”निवडणुकीला अजून अवकाश आहे, असं आपण मानतो. माझ्या मते येत्या वर्षभरात निवडणूका होऊ शकतात.”

“कर्नाटकसाठी महाराष्ट्र तोडण्याचं कारस्थान, गुजरातची महाराष्ट्रातील उद्द्योग पळवण्याचं कारस्थान करण्यात येत आहे”, असा हल्लाबोल देखील त्यांनी शिंदेगट आणि भाजपवर केला आहे. ”मध्यवधी निवडणूक लागली तर भाजप चिन्हावर लढणार नाही, हे त्यांनी (शिंदे गटाने) सांगावं. ते म्हणाले, रोज एक घोटाळा बाहेर येतोय. आपले घोटाळे लपवण्यासाठी हे तिकडे गेलेत.पंतप्रधानांची भावना प्रामाणिक असले तरी आजूबाजूला बसणारे तसे नाही.”, अशी खोचक टीका देखील उद्धव ठाकरेंनी केली आहे.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले आहेत की, नागपुरात कस्तुरचंद पार्कवर सभा घेऊ. पूर्वी सभा घेतली होती त्यावेळी आठ-दहा हजार लोक येतील, असा अंदाज पोलीस व्यक्त करत होते. मात्र लोकांनी खूप प्रतिसाद दिला. मला नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना किंमत आहे. ते म्हणाले, संजय राऊत तुरुंगात होते, आमिष दाखवण्यात आले. मात्र ते सोबत आहेत. त्यांना शांत झोप लागते. माझ्या झाडाची मुळं आता सोबत आहेत. ते म्हणाले, पूर्व विदर्भाची माफी मागतो. युतीत हा भाग सोडला होता. मात्र आता नाही.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, आपल्याच लोकांनी जास्त वार केले. बाबरी वेळेस आपली चूक झाली. त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी सांगितले की, बाबरी शिवसैनिकांनी पाडली तर अभिमान आहे. त्यानंतर देशात अनेकजण शिवसेनेत (Shiv Sena) येण्यास तयार होते. मात्र हिंदू व्होट बँकेला छेद नको म्हणून शिवसेनाप्रमुखानी नकार दिला.

हे ही वाचा:

विधानपरिषदेत झालेल्या गोंधळानंतर सुषमा अंधारेंनी केला मोठा दावा, शिंदे गटाच्या चार मंत्र्यांना अडचणीत आणणं हे फडणवीसांचं षडयंत्र

“मी आता अमृता वहिनींनाच सांगणार आहे की…”; अजित पवारांच्या विधानामुळे अधिवेशनात पिकला हशा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss