spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Jitendra Awhad : तक्रारदार महिलेचा ‘बहीण’ म्हणून उल्लेख, जयंत पाटील यांनी जुना दाखवला व्हिडीओ

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात राज्य महिला आयोगाने कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदार महिलेने केली. आव्हाडांविरोधात विनयभंगाची तक्रार देणाऱ्या पीडित महिलेने आज मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेत आव्हाडांनी जाणूनबुजून ते कृत्य केले असल्याचा आरोप केला. मात्र त्या महिलेचा राष्ट्रवादी काँग्रेसने पर्दाफाश केला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज भर पत्रकार परिषदेत एक जुना व्हिडीओ दाखवून जितेंद्र आव्हाड त्या महिलेचा माझी बहीण असा उल्लेख करत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ दाखवल्यानंतर आव्हाड ज्या महिलेला बहीण म्हणतात तिचा विनयभंग कसा करतील? असा सवाल जयंत पाटील यांनी केला आहे.

‘महाराष्ट्रात अतिशय गलिच्छ प्रकार सुरू, आव्हाड प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी’ ; अजित पवार

यावेळी जयंत पाटील यांनी आव्हाड यांच्या जुन्या कार्यक्रमाची क्लिप दाखवली. या कार्यक्रमात आव्हाड स्टेजवर भाषण करताना दिसत आहे. या स्टेजवर महिलाही दिसत आहे. यावेळी जितेंद्र आव्हाड या महिलेचा बहीण असा उल्लेक करताना दिसत आहेत. हमारी बहेन तो मुंबई से आती है… असं आव्हाड या व्हिडिओत बोलताना दिसत आहेत. ही क्लिप दाखवल्यानंतर विनयभंगाचा गुन्हा दाखल कसा? असा सवाल पाटील यांनी केला.

हेही वाचा : 

Sunil Shende : ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचं निधन; सिनेसृष्टीवर शोककळा

‘आम्ही विनयभंगाचं समर्थन कधीही करणार नाही. मात्र या घटनेमध्ये तसं काहीही झालेलं नाही. जितेंद्र आव्हाड यांनी सदरील महिलेला मुख्यमंत्र्यांच्या गाडीपासून केवळ दूर केलं. गर्दीत का येतात असं म्हणतात आणि पुढे जातात. त्यात कोणत्याही प्रकारची वेगळी कृती दिसत नाही, असंही त्यांनी सांगितलं व मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून निर्णय घ्यावा’ अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.

https://fb.watch/gNOguLxCBn/

आव्हाडांच्या समर्थनासाठी निदर्शने

जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे ट्वीट केले. त्यानंतर आज सकाळपासून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. मुंब्रामध्ये बंद पाळण्यात आला आहे. तर, दुसरीकडे काही ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

Raj Thackeray : राज ठाकरे कोकण दौऱ्यावर, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या बांधणीवर जोर

Latest Posts

Don't Miss