spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

हिंदू शब्द फारसी आहे… याचा अर्थ अत्यंत घाणेरडा, कर्नाटक काँग्रेस नेते सतीश जारकीहोळी यांचे वादग्रस्त विधान

कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी हिंदू शब्दाबाबत अत्यंत लाजिरवाणे विधान केले आहे. काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यानंतर वाद आणखीनच चिघळत चालला आहे. हिंदू हा शब्द केवळ भारताचा नाही, असे काँग्रेस नेते सतीश जारकीहोळी यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की हिंदू हा शब्द पर्शियामधून आला आहे. तसेच हिंदू शब्दाचा अर्थही अत्यंत गलिच्छ असल्याचे सांगितले. त्याचवेळी काँग्रेस नेत्याच्या या वक्तव्यानंतर सगळेच विरोधक हल्लेखोर दिसत आहेत. कर्नाटकातील बेलगावी जिल्ह्यातील निप्पाणी भागात आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी काँग्रेस नेते आले होते.

काँग्रेस नेते सतीश जारकीहोळी यांनी हिंदू या शब्दाबाबत म्हटले आहे की, त्याचा अर्थ अत्यंत घाणेरडा आहे. हिंदू हा शब्द फक्त भारतीय नसून तो परदेशी पर्शियन शब्द आहे, असेही सांगितले. आमच्यावर जबरदस्ती केली जात आहे. जेव्हा त्याला काही अर्थ नसतो. केवळ आपल्या देशाचा नसलेल्या शब्दासाठी आपल्यावर दबाव का आणला जातो यावर चर्चा व्हायला हवी, असे ते म्हणाले. हिंदू हा शब्द परकीय आहे, त्याबद्दल आपल्या देशात बोलू नये.

मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेते कर्नाटकातील बेलागावी जिल्ह्यातील निप्पाणी भागात एका निवडणूक सभेला संबोधित करत होते, आणि याच दरम्यान त्यांनी हिंदू शब्दा विरोधात असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. काँग्रेस नेते सतीश जारकीहोली म्हणाले की “हिंदू हा शब्द फक्त भारतीय नसून तो परदेशी फारसी शब्द आहे. त्याची जबरदस्ती आपल्यावर केली जात आहे. त्यामुळं त्याला काही अर्थ नाही. केवळ आपल्या देशाचा नसलेल्या शब्दासाठी आपल्यावर दबाव का आणला जातो, यावर चर्चा व्हायला हवी, हिंदू हा शब्द परकीय आहे, त्याबद्दल आपल्या देशात बोलू नये.

हे ही वाचा :

ट्विटरने कॉपीराइट उल्लंघनाबद्दल काँग्रेस, भारत जोडो यात्रेचे हँडल ब्लॉक करण्यास सांगितले

सत्तारांच्या भाषणावेळीच कार्यकर्ते निघाले; चालू भाषणातच खुर्च्या उचलण्याची वेळ आली

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss