आमच्यासमोर कोणताही प्रस्ताव नाही, ‘वंचित’सोबतच्या आघाडीबाबत पवारांच मोठं वक्तव्य

आमच्यासमोर कोणताही प्रस्ताव नाही, ‘वंचित’सोबतच्या आघाडीबाबत पवारांच मोठं वक्तव्य

काही दिवसांपूर्वी शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray ) आणि वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) या पक्षांमध्ये युती झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. यानंतर महाविकास आघाडीतील अन्य पक्षातील नेत्यांची या युतीसंदर्भात काय प्रतिक्रिया असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण या पूर्वीच प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांनी शरद पवार यांना टोला लगावला होता. यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी त्यांच्यावर आक्षेप घेतला होता. यामुळे संजय राऊत आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात राजकीय आणि शाब्दिक पेच तयार झाल्याचे आढळले होते. तर आता वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या युतीबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (sharad Pawar) यांनी भाष्य केले आहे. तसेच शरद पवार यांनी पहाटेच्या शपथविधी संदर्भात देखील भाष्य केले आहे.

आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे. अलीकडेच राष्ट्रवादी नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी एक वक्तव्य केलं होत. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात चलबिचल सुरु झाली आणि त्यांनी केलेले वक्तव्य चर्चेचा विषय ठरले होते. या वेळेस जयंत पाटील यांनी वक्तव्य केले होते की पहाटेच्या शपतविधी ही शरद पवारांची खेळी असल्याचे सांगितले होते. यावर राजकीय वर्तुळात अनेक तर्क काढण्यात आले. पण आता यावर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः भाष्य केले आहे. कोल्हापुरात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पवारांना जयंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रश्न विचारणत्यात आला होता. या प्रश्नावर शरद पवार यांनी सांगितलं की ” पहाटेच्या शपथविधीला आता दोन वर्ष होऊन गेले आहेत. त्यामुळे आता तो प्रश्न कशाला काढायचा. ” असे शरद पवार म्हणाले.

वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या युतीबाबत शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावरही शरद पवार यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की “आमची वंचित बहुजन आघाडी सोबत कोणतीही चर्चा झालेली नाही. मात्र आम्ही आगामी निवडणुका महाविकास आघाडी म्हणून सामोरे जाणार आहोत. आम्ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत एकत्र आहोत.” शरद पवार यांच्या या वक्तव्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्याकडून सहमती दर्शवण्यात आली आहे.

हे ही वाचा:

ज्या दिवशी जगाला खरं कळेल पवार साहेब… , निलेश राणेंचा पवारांवर होल्ल्लबोल

सामनातून शिवसेनेने भाजपवर साधला अप्रत्यक्ष निशाणा, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व सावरकर यांना या वेळी तरी ‘भारतरत्न’ने सन्मानित…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version