म्यानात तर एकच तलवार असते मग यांच्याकडे दोन कशा, शिंदे गटाच्या चिन्हावर सुष्मा अंधारेंची प्रतिक्रिया

शिंदेगटाने घेतलेली ढाल आहे. त्यांनी शिवसेनेचा केलेला विश्वासघात आणि गद्दारी लपवण्यासाठी ही ढाल ते वापरणार आहेत. तर प्रश्न हा ढालीच नसून तलवारीचा आहे.

म्यानात तर एकच तलवार असते मग यांच्याकडे दोन कशा, शिंदे गटाच्या चिन्हावर सुष्मा अंधारेंची प्रतिक्रिया

आज सकाळी शिंदे गटाने निवडणूक आयोगासमोर तळपता सूर्य, ढाल-तलवार आणि पिंपळाचं झाड या तीन चिन्हांचा पर्याय ठेवला आहे. यात शिंदे गटाकडून ‘तळपता सूर्य’ चिन्हाला प्राधान्य असल्याचे सांगितले जात होते. पण, निवडणूक आयोगाने शिंदेगटाला ढाल आणि तलवार हे चिन्ह दिलं आहे. त्यांच्या या चिन्हावर ठाकरे गटातील नेत्या सुष्मा अंधारे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आम्ही खेळकर लढाया लढणाऱ्यामधली माणसं आहोत आम्ही रडीचा डाव खेळत नाही.  आम्ही ओपन किचन सामना खेळणारी माणसं आहोत. त्यामुळे आता हा सामना लवकरच सुरू होणार आहे, पण हा सामना सुरू होण्यापूर्वी एक प्रश्न आहे एका म्यानामध्ये एकच तलवार राहू शकते मात्र त्यांच्या चिन्हांमध्ये दोन तलवारी आहे. मग आता निवडणूक लढवताना भाजप देवेंद्रजींची तलवार वापरणार की एकनाथजींची, असा सवाल सुष्मा अंधारे यांनी केलाय.  मला वाटतं भाजपच्या गटामध्ये देवेंद्रजींच्या तलवारीला धार असेल मग एकनाथजींची तलवार जाणार कुठे.

चिन्हामधील ढाल कशाचे प्रतीक आहे असे विचारले असता सुष्मा अंधारे म्हणाल्या ती ढाल म्हणजे आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत असं म्हणत शिंदेगटाने घेतलेली ढाल आहे. त्यांनी शिवसेनेचा केलेला विश्वासघात आणि गद्दारी लपवण्यासाठी ही ढाल ते वापरणार आहेत. तर प्रश्न हा ढालीच नसून तलवारीचा आहे. भाजपामध्ये देवेंद्रजींच्या ढालीला जास्त धार असणार आहे जास्त मान असणार आहे तर एक राज शिंदे यांची तलवार कुठे जाणार.

पाठीत कोणी खंजर  खूपसु शकत नाही कारण आमचं रक्षण करायला ढाल आहे असं शिंदे गटाने केलेल्या वक्तव्यावर तुमचं काय मत आहे असे विचारले असता,  सुष्मा अंधारे म्हणाल्या, त्यांचं म्हणणं खरंच बरोबर आहे त्यांच्या पाठीत कोणी खंजीर खुपसून शकत नाही कारण जे लोक जे लोक आधीच बदमाश्या करणारे आहे त्यांच्या शिवाय कोण बदमशी करेल.  जे आधीच फितूर लोक आहेत त्यांच्याशी फितुरी कोण करणार.  जे यात महीर आहेत, ज्यांना यातले छक्के पंजे माहिती आहेत त्यांना कोण फसवू शकणार आहे.

शिंदेगट जे म्हणतोय ते बरोबर आहे कारण त्यांनी आधीच लोकांचा विश्वासघात  केलेला आहे, जनतेला फसवलेललं आहे आणि त्यांची स्वामिनिष्ठा किती तकलादु आहे हेही दाखवून दिलेलं आहे.  शिंदे गटाने जे  ढालीबद्दल वक्तव्य केले आहे ते बरोबर आहे कारण भाजप गटाने त्यांना कव्हर दिलय इडी, सीबीआय यांचा कव्हर शिंदे गटाचे संरक्षण करत आहे त्यामुळे त्यांच्या पाठीत कोणी खंजर खुपसू शकत नाही.

Exit mobile version