Tuesday, July 2, 2024

Latest Posts

Maharashtra Assembly Mansoon Session 2024 : “मतभेद असावेत परंतु मनभेद असू नयेत..” ; आजच्या अधिवेशनातील घटनांवर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया

याचं उदाहरण आज आपल्याला पाहायला मिळालं. महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचं काम नेत्यांनी करायला हवं, म्हणून मी या घटनेला गैर समजत नाही. अत्यंत चांगली भेट झाली, त्यामुळे आम्हाला समाधान आहे, असं संजय शिरसाट म्हणाले." 

आज पासून म्हणजेच २७ जून २०२४ राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Maharashtra Vidhan Sabha session)  मुंबई येथे सुरु झाले आहे. या १४ व्या विधानसभेचे हे शेवटचे अधिवेशन आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या या अधिवेशनाला विशेष महत्त्व आहे.  महायुती सरकारचे हे अधिवेशन सध्या चर्चेचा विषय झाले आहे. सदर पावसाळी अधिवेशन शुक्रवार, १२ जुलै २०२४ या कालावधीपर्यंत सुरु राहणार आहे. राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प २८ जून रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे. आजचे हे पावसाळी अधिवेशन सुरू होताच वादळी बनल्याचे दिसले. यासाठी सर्वात महत्वपूर्ण प्रश्नांची चर्चा करण्यात आली होती. पहिलीच चर्च ही इंदिरा गांधींच्यावेळी लागू झालेल्या आणीबाणी विषयी होत ज्यामुळे संपूर्ण सभागृहात गदारोळ मजला. त्यांनतर पहिल्याच दिवशी विरोधकांनी जोरदार हल्लाबोल करत विरोधक आक्रमक बनले.

विरोधकांनी आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर जमा होऊन जोरदार घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधकांनी विधानसभेच्या पायऱ्यावर प्रचंड गोंधळ घातला. टक्केवारी सरकार, चोर सरकार अशा घोषणा देत विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या आणि आर्थिक पाहणी अहवाल सादर होत आहे. तर २८ जूनला अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. यावेळचे हे अधिवेशन विशेष स्वतःचे वेगळेपण स्पष्ट करताना दिसत आहे.

त्याचे कारण असे कि यावेळी सर्व विरोधी पक्षनेते हे एकमेकांशी अतिशय हसत खेळत, हस्तांदोलनकरत वावरताना दिसत आहे. यात आज सर्व घटना वेगवेगळ्या पद्धतीने दिसल्या. पहिले ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve)यांच्या कार्यालयात भाजपचे नेते चंद्रकांत पाटील आले होते. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)आणि अनिल परब देखील उपस्थित होते. यावेळी थोडं थांबा..गप्पा मारा, असं उद्धव ठाकरे चंद्रकांत पाटील यांना बोलताना दिसले. यानंतर उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एकत्र लिफ्टने प्रवास केला. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विधानसभेतील या घडामोडींवर आता विविध प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट (Snjay Shirsat) यांनी यावर भाष्य केलं.

संजय शिरसाट म्हणाले :

“उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात बोलणं झालं. तसेच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र लिफ्टमधून प्रवास केला. याचा अर्थ आमचे काही वैयक्तिक भांडणं नाहीत. उद्धव ठाकरेंना संजय राऊतांसारखे लोक चुकीचं मार्गदर्शन करताय, कदाचित त्यांना याचा प्रत्यय आला असावा. राजकीय भांडण वेगळं, परंतु वैयक्तिक संबंध नेहमी असतात आणि ते कायम राहावे ते कधी तुटू नयेत. बाळासाहेब नेहमी म्हणायचे की तुमचे मनभेद नसावे. याचं उदाहरण आज आपल्याला पाहायला मिळालं. महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचं काम नेत्यांनी करायला हवं, म्हणून मी या घटनेला गैर समजत नाही. अत्यंत चांगली भेट झाली, त्यामुळे आम्हाला समाधान आहे, असं संजय शिरसाट म्हणाले.”

नेमके काय झाले ते जणूयात सविस्तर :

चंद्रकांत पाटील दालनात आल्यावर अंबादास दानवे यांनी त्यांच्यासमोर पेढ्याचा बॉक्स धरला. दादा लोकसभा निवडणुकीत आमचे ३१ खासदार निवडून आले म्हणून आम्ही पेढे वाटत आहोत, असे अंबादास दानवे यांनी म्हटले. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या हातातील पेढ्याचा एक तुकडा शेजारी उभे असलेल्या अनिल परब यांना देत म्हटले की, मी यांचा पेढा ॲडव्हान्समध्ये वाटतो. ठाकरे गटाचे अनिल परब हे नुकतेच मतदान पार पडलेल्या मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीला उभे आहेत. त्यांच्याविरोधात भाजपचे किरण शेलार रिंगणात आहेत. या निवडणुकीचा निकाल १ जुलैला जाहीर होईल. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब यांचे अगोदरच अभिनंदन केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

हे ही वाचा

महिलांसाठी खुशखबर ! राज्यात येणार ‘ही’ नवी योजना.. 

चोपडा बस स्थानकाने पटकावला स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाचा किताब..

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss