spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार?, उद्धव ठाकरेंच्या विश्वासू आमदाराची राणेंशी चर्चा

राज्याच्या राजकारणात कधीही काही होऊ शकतं, याचा नेम नाही. कधी कोणतं सरकार पदे कोण येईल? कधी कोण पक्ष सोडेल तर काही काय...

राज्याच्या राजकारणात कधीही काही होऊ शकतं, याचा नेम नाही. कधी कोणतं सरकार पदे कोण येईल? कधी कोण पक्ष सोडेल तर काही काय… रोज नवनवीन प्रकार राज्यात घडत असतात. दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात असाच एक मोठा भूकंप घडला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे ४० आमदार महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडले. त्यांनी भाजपासोबत मिळून सरकार स्थापन केलं. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हावं लागलं. तर त्या पाठोपाठ अजित पवार यांनी राष्ट्रवादी मधून काढता पाय घेतला. लोकसभा निवडणुकीच्यावेळी सर्वच पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग आणि आऊटगोईंग झालं. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच राजकीय चित्र असं बदललय की, कुठलीही गोष्ट ठामपणे म्हणता येणार नाही. तर आता पूढे २ ते ३ महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुका लागू शकतात. या निवडणुकांच्या पार्श्ववभूमीवर राज्यात पुन्हा एकदा भूकंप तर होणार नाही ना अश्या अनेक चर्चाना उधाण आलं आहे. अश्यातच राज्यच्या राजकारणातून मोठी आणि महत्वाची अपडेट समोर आली आहे.

सध्या तळ कोकणात दोन नेत्यांमधील गुप्तगूचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. महत्त्वाच म्हणजे हा नेता आमदार असून उद्धव ठाकरे यांचा विश्वासू मानला जातो. या नेत्याचे नितेश राणेंसोबत चर्चा करतानाचे फोटो व्हायरल झालेत.भाजप आमदार नितेश राणे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्यामध्ये चर्चा झाली. दोघांच्या जवळीकीने राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. मुंबईतील काल सह्याद्री गेस्ट हाऊसवर मच्छीमारांच्या प्रश्नसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी दोघेही एकमेकांच्या शेजारी बसले होते. त्यावेळेला दोघांमध्ये चर्चा झाली. शिवसेनेत दोन गट पडले, त्यावेळी राजन साळवी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहीले. राजन साळळी शिंदे गटात जाणार अशा बऱ्याच चर्चा झाल्या. पण ते अजूनही ठाकरे गटातच आहेत.

हे ही वाचा:

SANKASHTI CHATURTHI 2024: जाणूयात संकष्टी चतुर्थी विषयीची महती ; उपवास कसा करावा ते उपवास कसा सोडावा..

MCA ELECTION : अजिंक्य नाईक ठरले MCA च्या नव्या अध्यक्षपदाच्या विजयाचे मानकरी..

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss