spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

काँग्रेसमध्ये पडणार फूट; अशोक चव्हाणांसोबत 15 आमदार सामील होणार भाजपमध्ये?

चव्हाण यांनी काँग्रेसचे किमान 15 आमदार सोबत आणावे

हल्लीच भाजपचे पदाधिकारी असलेल्या आशिष कुलकर्णी (Ashish Kulkarni) यांच्या घरी गणपतीच्या निमित्ताने अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट झाली होती. राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने ही बाब महत्वाची समजली जात आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून अशोक चव्हाण हे देखील भाजपाच्या वाटेवर अशी चर्चादेखील सुरु झाल्या होत्या. दोन्ही नेत्यांची ही भेट झाल्याचे आशीष कुलकर्णी यांनीही मान्य केले होते. पण या भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं अशोक चव्हाण सांगितले होते.

अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. आधीच केंद्रातील काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांमुळे अनेकांचे राजीनामे पडले आहेत. तर महाराष्ट्रातील काँग्रेसमध्ये देखील फूट पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काँग्रेसचे माजी दोन नेते लवकरच शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात शपथ घेणार असल्याची चर्चाही रंगली आहे. तसंच अशोक चव्हाण यांच्यासोबत तीन नेते आणि 9 आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दिल्लीतून केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. एकनाथ शिंदे यांनी प्राथमिक बोलणी केल्यानंतर भाजपकडून प्रयत्नांना सुरुवात झाली आहे, असं पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. ज्योतिरादित्य यांचे वडील माधवराव आणि अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण यांच्यात चांगले संबंध होते. आणि दोन्ही नेते मुळ काँग्रेसचेच. त्यामुळे बोलणी आणखी सोपी झाल्याचं सांगण्यात येतय. काँग्रेसच्या बळावर राज्यात सत्ता येणे कठीण असल्याचे चव्हाणांना जाणवू लागले होते. सत्ता गेली तर किमान मंत्रिपद तरी आपल्याकडे असावे, या भूमिकेतून भाजपकडे चर्चेसाठी हा डाव टाकला असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

मध्यंतरी अब्दुल सत्तार यांनी चव्हाणांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनीही चर्चा केली. चव्हाण यांनी काँग्रेसचे किमान 15 आमदार सोबत आणावे अशी भाजपच्या वरिष्ठांची अपेक्षा आहे, अशी माहितीही समोर आली आहे.

हे ही वाचा:

हैदराबादमध्ये ब्रह्मास्त्रचा प्री-रिलीज इव्हेंट रद्द, कलाकारांनी चाहत्यांची मागितली माफी

महानगरपालिकेच्या धोरणामुळे शिंदे गटाला घ्यावी लागणार माघार?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss