Wednesday, September 25, 2024

Latest Posts

मुख्यमंत्र्यांनी केल्या या ५ घोषणा

जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचे आज तिसऱ्या दिवशीही राज्यात पडसाद उमटले आहेत. या घटनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. तर राज्यभरात मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. त्यामुळे राज्यात तणावाची परिस्थिती आहे

जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचे आज तिसऱ्या दिवशीही राज्यात पडसाद उमटले आहेत. या घटनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. तर राज्यभरात मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. त्यामुळे राज्यात तणावाची परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ५ महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. मराठा आरक्षण आणि आंदोलनाशी संबंधित या घोषणा आहेत. तसेच कुणीही विरोधकांच्या नादी लागू नका. विरोधक राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला .मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी बुलढाण्यात आले होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं. मी तीन दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांना फोन केला होता. तू उपोषण करून को. तुझी तब्येत ठिक नाही. आपण चर्चा करू, असं मी त्यांना सांगितलं होतं. पण तरीही त्यांनी उपोषण केलं, असं सांगतानाच आंदोलकांवर लाठीमार झाल्याचं आम्ही समर्थन करत नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी ५ महत्त्वाच्या घोषणा केल्या. आंदोलकांवर लाठीमार केल्या प्रकरणी जालन्यातील पोलीस अधीक्षकाला आम्ही सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे, डीवायएसपीलाहा जिल्ह्यातून बाहेर पडण्याचे आदेश दिले आहेत, अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) सक्सेना हे उद्याच जालना येथे येतील आणि दोषींना निलंबित केले जाईल, मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या घटनेची वेळ पडल्यास न्यायालयीन चौकशीही केली जाईल, आदी मोठ्या घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या. तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठीची प्रक्रिया सुरु करण्यात आल्याची घोषणाही त्यांनी केली आहे. मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असंही ते म्हणाले.जालन्यात दुर्दैवी घटना झाली. त्याचे मलाही दुःख झाले आहे. सर्वांनाच त्याचे दु:ख आहे. काही लोकं तिथे येऊन गेले. त्यांना लोकांनी त्यांची जागा दाखवली. ज्या लोकांनी मराठा आरक्षणाचे गळे घोटले, ते लोकं तिथे गळा काढायला गेले होते, अशी टीका करतानाच महाविकास आघाडीच्या काळात सुप्रीम कोर्टात हे आरक्षण गेले. अशोक चव्हाण तुम्ही उपसमितीचे अध्यक्ष होते, तुम्ही काय केले?, असा संतप्त सवाल त्यांनी केला.

मराठा समाजाचे मूक मोर्चे निघत होते. शांततेत मोर्चे निघत होते. शिस्तबद्ध मोर्चे निघत होते. लाखोंचे हे मोर्चे होते. यावेळी माजी मुख्यमंत्र्यांनी या मोर्चाला ‘मुका मोर्चा’ म्हणून संबोधले होते, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता केली. जेव्हापासून मी मुख्यमंत्री झालो, तेव्हापासून आज सरकार जाणार, उद्या जाणार असं चालू झाले आहे. आता सगळे ज्योतिषी बंद झाले. सरकार पडता पडता, अजितदादा आमच्यासोबत आले. आता म्हणतात, मुख्यमंत्री बदलणार. मी काय तुमचं घोडं मारलंय? जनता माझ्याबरोबर आहे, तोपर्यंत कोणीही माझा बाल बाका करू शकत नाही, असंही ते म्हणाले.

हे ही वाचा:

आदित्य L १ मध्ये महिला शास्त्रद्यांचा सहभाग

मराठा समाजानं शांतता राखावी, उदयनराजे भोसले म्हणले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss