… ह्या बातम्या परत कधीच वाचायला लागू नयेत; राज ठाकरेंनी सोशलमिडियाद्वारे केला संताप व्यक्त

राज्यात लहान मुलांकडून वेठबिगारी करून घेण्याच्या घटना समोर येत आहेत. या प्रकारावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

… ह्या बातम्या परत कधीच वाचायला लागू नयेत; राज ठाकरेंनी सोशलमिडियाद्वारे केला संताप व्यक्त

राज्यात लहान मुलांकडून वेठबिगारी करून घेण्याच्या घटना समोर येत आहेत. या प्रकारावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. राज ठाकरे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून अशा प्रकारे वेठबिगारी करून घेणाऱ्यांना धडा शिकवण्याचा इशारा दिला आहे. तसेच लहान मुलांकडून वेठबिगारी करून घेतली जात असेल तर पोलिसांत तक्रार करा किंवा मनसेच्या (mns) पदाधिकाऱ्यांच्या कानावर हा प्रकार टाकण्याचे आवाहनही राज ठाकरे यांनी केलं आहे. राज्यात मुलांचं शोषण होऊ नये. लहान मुलांकडून कोणीही वेठबिगारी (bonded labour system) करून घेऊ नये, असंही त्यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे यांची फेसबुक पोस्ट –

गेल्या काही दिवसांपासून, विविध वर्तमानपत्रांमध्ये लहान मुलांना वेठबिगारी करण्यास भाग पाडलं जातंय, अशा आशयाच्या बातम्या वाचल्या. ह्या बातम्या मन विषण्ण करणाऱ्या आहेत. नाशिक, नगर, ठाणे, पालघर अशा जिल्ह्यांमध्ये वेठबिगारीचे प्रकार समोर येत आहेत. पैशासाठी मुलांवर वेठबिगारीची वेळ यावी, हे भीषण आहे. आज कायद्याने वेठबिगारीचं उच्चाटन झालं असलं तरी ही प्रथा अस्तित्वात आहे, आणि प्रगत म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात ह्या घटना आढळणं हे राज्याला शोभणारं नाही. राज्यसरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना ह्या घटनांचा छडा लावण्याचे निर्देश तात्काळ द्यायला हवेत. वेठबिगारांचा शोध, सुटका आणि पुनर्वसन ह्याकडे संपूर्ण प्रशासनाने कमालीच्या सहानुभूतीने लक्ष द्यायला हवं. पण हे करताना एकूणच जागृत समाजाने पण पुढे यायला हवं. वेठबिगारी ही क्रूर प्रथा आहे, आणि तिच्या निर्मूलनासाठी समाजात सतर्कता हवी. असे प्रकार तुम्हाला कुठेही आढळले तर तुम्ही पोलिसांत तक्रार करा किंवा जवळच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयाला किंवा माझ्या कोणत्याही महाराष्ट्र सैनिकाला सूचित करा, ते कायदेशीर मदत घेऊन कारवाई तर करतीलच. पण गरज पडलीच तर वेठबिगारी करून घेणाऱ्यांना महाराष्ट्र सैनिक आपल्या पद्धतीने धडा पण शिकवतील. असे महाराष्ट्र नवनिर्मण सेने अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणले आहेत

तसेच ह्या बातम्या परत कधीच वाचायला लागू नयेत हीच इच्छा.. म्हणत राज ठाकरे यांनी तीव्र संतापासोबत चिंता देखील व्यक्त केली आहे.

हे ही वाचा:

सुपरमॉलमध्ये वाईन विक्रीचा निर्णय शेतकऱ्यांच्या फायद्याचा : अब्दुल सत्तार

India vs Australia : भारताचा मुख्य गोलंदाज करणार का पुनरागमन ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version