या गद्दारांनी खोके केवळ स्वतःसाठी ठेवलेत, मदतीला दिले नाहीत; आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणा

या गद्दारांनी खोके केवळ स्वतःसाठी ठेवलेत, मदतीला दिले नाहीत; आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणा

यंदा परतीच्या पाऊस आणि अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे काही दिवसांपूर्वी औरंगाबाद दौऱ्यावर गेले होते. शेती नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाणार असल्याची माहिती समोर आली होती. शिंदे-फडणवीस यांच्या या दौऱ्याआधी आदित्य ठाकरेंनी बाजी मारली आहे. राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून विरोधक ओला दुष्काल जाहीर करण्याची मागणी करत आहेत. शेतकरी प्रतिक्षेत असताना राज्य सरकारकडून मदतीची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. यादरम्यान आमदार आदित्य ठाकरे नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. आम्ही शेतकऱ्यांसोबतच आहोत, प्रशासनाला तातडीने मदत करायला लावू असा शब्द आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

आज सकाळीच आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत.. यानंतर ते पुणे दौऱ्यावर जाणार आहेत. आदित्य ठाकरेंनी नाशिक येथील शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांच्या मागण्या, त्यांचं झालेलं नुकसान याबाबतची माहिती घेतली. “या गद्दारांनी खोके केवळ स्वतःसाठी ठेवलेत, मदतीला दिले नाहीत,” अशी टीका यावेळी आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे.

या दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी पांढुर्ली येथील शेतकऱ्यांसोबत संवाद साधताना कोणीही धीर सोडू नका, उद्धव साहेबांनी फक्त तुमच्यासाठी आम्हाला येथे पाठवलं आहे असं सांगितलं. “गद्दारांनी खोके त्यांच्याजवळ ठेवले, पण मदतीला दिले नाहीत. पण आम्हाला राजकारण करायचं नाही. ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे ही शेतकऱ्यांची मागणी आहे आणि याबाबतचा आवाज आम्ही विधानसभेत उठवू,” असा शब्द आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला. पुढे आदित्य ठाकरे यांनी शिंदे ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी शिंदे ग्रामस्थांनी राज्य सरकारबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. आम्हाला मदत सोडा, मुख्यमंत्री भेटायला पण आले नाहीत, असं गाऱ्हाणं मांडलं.

हे ही वाचा :

झुलन गोस्वामीला क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल तर्फे दिग्गज क्रिकेटपटू पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार

Congress : मल्लिकार्जुन खरगे यांच्या काँग्रेस सुकाणू समितीत शशी थरूर यांना स्थान नाही, समर्थकांची नाराजी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version