ते प्रत्येक वेळा भूमिका बदलतात, शिंदे गटावर संजय राऊतांचा हल्लाबोल

ते प्रत्येक वेळा भूमिका बदलतात, शिंदे गटावर संजय राऊतांचा  हल्लाबोल

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाला चांगलाच वेग आला आहे. काही महिन्यांपूर्वीच म्हणजेच जून २०२२ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अचानक केलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालं होत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी थेट शिवसेनेवर आणि धनुष्यबाण शिवसेनेच्या मूळ चिन्हावर दावा सांगितला होता . त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण न्यायालयात आणि निवडणूक आयोगाकडे नेण्यात आले. तर आता शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह नेमकं कुणाला मिळणार? या संदर्भातील उत्सुकता प्रचंड ताणली गेली आहे. निवडणूक आयोगासमोर यासंदर्भात सध्या सुनावणी सुरू असून ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही बाजूंनी आयोगासमोर युक्तिवाद झाला आहे. तर आता या प्रकरणावर सुनावणी होण्यापूर्वीच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यामुळे आम्ही शिवसेना सोडली असा दावा शिंदे गटाने केला होता.यावर संजय राऊत यांनी शिंदे गटाकडून करण्यात आलेल्या दाव्यावर टीका केली आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटाने केलेल्या आरोपाला फेटाळत शिंदे गेटवरच टीका केली आहे. शिंदे गटाने सांगितले होते की”संजय राऊतांच्या धमक्यांमुळे आम्ही शिवसेना सोडली”, असा दावा शिंदे गटाने केला होता यावर संजय राऊत म्हणाले की “लाठ्या मारा किंवा त्यांना दंडुक्याने बडवून काढा असं भाषण मला वाटतं आज त्यांच्या गटात असणाऱ्या शीतल म्हात्रे यांनीच अलिबागच्या सभेत केलं होतं. त्यांनी एकदा स्पष्ट केलं पाहिजे की नेमके ते का सोडून गेले? मी धमक्या दिल्यामुळे सोडून गेले की शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेससह युती केल्यामुळे सोडून गेले की हिंदुत्वाच्या संदर्भात त्यांच्या भूमिका वेगळ्या होत्या म्हणून ते सोडून गेले. त्यांनी एकदा स्पष्ट केलं पाहिजे. ते प्रत्येक वेळा भूमिका बदलतात”, असे म्हणत संजय राऊत यांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे. सध्या शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत पॅट या दरम्यान आता निवडणूक आयोग शिवसेना पक्षाचे चिन्ह आणि नाव हे कोणाकडे देणार यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version