Sunday, September 29, 2024

Latest Posts

जरूर त्यांनी आपापली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करावा, पण ……; अजित पवार यांनी ठाकरे आणि शिंदे यांना खडसावले

आजचा दिवस राजकारणसाठी खूप महत्वाचा दिवस ठरणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेचे मुंबई दोन मळावे होणार आहेत. तयासाठो दोनी गटा कडून जय्यत तयारी सुरु आहे. दोन्ही बाजूंनी मेळाव्यांना ऐतिहासिक गर्दी होणार असल्याचे दावे करण्यात आले आहेत. या दोन्ही भाषणांकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना त्यावरून विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दोन्ही प्रमुख नेत्यांना आवाहन केलं आहे. तसेच, कटुता संपण्याविषयीही अजित पवारांनी सूचक भाष्य केलं आहे. अजित पवारां माध्यमांशी बोलत होते.

आज दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क आणि बीकेसी मैदानावर जोरदार तयारी सुरू असून संध्याकाळी किती गर्दी होणार? आणि दोन्ही नेते भाषणांमध्ये काय बोलणार? या दोन प्रमुख प्रश्नांची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. त्यासोबतच, एकाच वेळी मुंबईत दोन ठिकाणी इतके मोठे इव्हेंट होत असल्यामुळे प्रशासनावरही व्यवस्था आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त ताण येणार असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पातळीवर दोन्ही नेत्यांना अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना सल्ला दिला आहे.

अजित पवार माध्यमांशी बोलतांना सांगितले कि “दसऱ्याच्या दिवशी त्या दोघांनी समंजस भूमिका घ्यावी. जरूर त्यांनी आपापली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आपल्या पक्षाची भूमिका जनतेसमोर ठेवण्याचा अधिकार आहे. पण कुणाच्याहीबद्दल अनादराची भावना न दाखवता जी महाराष्ट्राची परंपरा आहे, तिला कुठेही बाधा लागणार नाही, डाग लागणार नाही, कमीपणा येणार नाही, कटुता वाढणार नाही अशा प्रकारे प्रत्येकाने वागावं असं आवाहन मी करेन”, असं अजित पवार यावेळी म्हणाले. “हे वाद आता इतके पराकोटीला गेले आहेत. त्यात कुणी पुढाकार घ्यायचा, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. शब्दानं शब्द वाढत जातो. एकानं आरे म्हटल्यावर पुढच्यानं कारे म्हणायचं. त्यातून ते इतकं खालपर्यंत जातं, की खालच्याही लोकांना वाटतं की आपण एकमेकांचे शत्रू झालो. असं नाहीये. तेवढ्यापुरतं आपापल्या भूमिका सांगण्याचं काम प्रत्येकानं करावं. पण एकदा राजकीय जोडे बाजूला ठेवले की सगळ्यांनी एकमेकांना सलोख्याच्या भावनेतून पाहावं”, असाही सल्ला अजित पवारांनी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंना दिला.

हे ही वाचा:

राष्ट्रीय राजकारणात KCR यांची दमदार एन्ट्री, तेलंगणा राष्ट्र समितीचं नाव आता हे असणार …

शिंदे गटाला धक्का, मुंबईत कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss