त्यांना डायपर घातले पाहिजे, हिंदू जन आक्रोश मोर्चातून थेट पवारांवर हल्लाबोल

या मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून सरकारचे याकडे लक्ष वेधण्यासाठी हिंदू समाजाने हिंदू जन आक्रोश मोर्च्याचे आयोजन केले आहे.

त्यांना डायपर घातले पाहिजे, हिंदू जन आक्रोश मोर्चातून थेट पवारांवर हल्लाबोल

सध्या देहात धर्मांतर, लव जिहाद, आणि गोहत्या या संबंधित गुन्हेगारीचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे लव जिहाद आणि धर्मांतराबद्दल राज्यात कडक कायद्यांची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. या मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून सरकारचे याकडे लक्ष वेधण्यासाठी हिंदू समाजाने हिंदू जन आक्रोश मोर्च्याचे आयोजन केले आहे. तसेच या मोर्च्यादरम्यान हिंदू राष्ट्र समितीचे धनंजय देसाई यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर कडाडून टीका केली आहे.

पुण्येश्र्वर मुक्त करण्यासाठी हिंदू राष्ट्र समितीने हे हिंदू आक्रोश आंदोलन पुकारल्याचे समितीतील धनंजय देसाई यांनी सांगितले आहे. तसेच ते पुढे त्यांनी अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर केलेल्या वकव्यावर देखील भाष्य केले आहे. संजय देसाई म्हणाले, पुण्यात आदिलशाहीचा उकिरड्यावरून आलेल्या काही सरदारांनी गाढवाचा नांगर फिरवला होता. गाढवाचं नांगर फिरवल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी सोन्याचा नांगर फिरवला.
धरणांमध्ये मुतून शेतकऱ्यांच्या ओला जखमांवर जखमा करणारे आता इतिहासात मुतू लागले आहेत, त्यांना डायपर घातले पाहिजे, अशा शब्दात त्यांनी नाव न घेता अजित पवारांवर टीका केली.

तसेच ते पुढे त्यांनी अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर केलेल्या वकव्यावर देखील भाष्य केले आहे. संजय देसाई म्हणाले, धर्मवीर संभाजी महाराज धर्मवीर नव्हते? कदाचित तुम्ही पवार नसू शकाल पण छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीरच होते. ते म्हणाले की, हा लढा राजकीय नाही हे हिंदू हिताचे राजकारण आहे, दीड दमडीच्या राजकीय नेत्यांनी आम्हाला धर्माची व्याख्या सांगू नये असेही त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांनी कितीही मशागत केली तरी काँग्रेस उगवतच त्याला वारंवार खुरपावे लागते. तस अदीलशाईने जो गाढवाचा नांगर फिरवला तो बारामती पर्यंत गेला आणि तिथे हर*** पिलावळ जन्माला आली. आम्हाला पक्षांची लंगोट नेसायची नाही आम्हाला जिहादी यांचा गर्भ मारायचा आहे.

हे ही वाचा:

जीवाश्मशास्त्रज्ञांना आले यश, भारतातील नर्मदा खोऱ्यात सापडली डायनासॉरची २५६ अंडी

पुण्यात लव्ह जिहाद विरोधात हिंदू जनआक्रोश मोर्चा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version