spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

हे दलितांचे. हे माळ्याचे…इतका घाणेरडा विचार असलेला महाराष्ट्र मी याआधी कधी पाहिलेला नाही, राज ठाकरेंनी व्यक्त केला संताप

हे मराठ्यांचे, हे दलितांचे. हे माळ्याचे…इतका घाणेरडा विचार असलेला महाराष्ट्र मी याआधी कधी पाहिलेला नाही,” असं राज ठाकरे म्हणाले.

मराठी चित्रपट ‘हर हर महादेव’च्या निमित्ताने अभिनेता सुबोध भावेने राज ठाकरेंची मुलाखत घेतली. या चित्रपटासाठी राज ठाकरे यांनी आवाज दिला असून, सुबोध भावे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. यावेळी बोलताना राज ठाकरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपल्या आठवणी, विचार मोकळेपणाने मांडले. तसंच राज्यातील सध्याच्या सामाजिक स्थितीवर भाष्य करत नाराजी जाहीर केली.महाराष्ट्रात इतके विलक्षण लोक जन्माला आले. पण आपण त्या सर्वांना जातीमध्ये अडकलं आहे असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

“छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राची ओळखच आहे. पण महात्मा ज्योतीराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत ज्ञानेश्ववर महाराज यांच्यासह इतके संत, साहित्यिक, क्रांतीकारक आपल्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले आणि ही माती विचारांनी सुपिक केली. पण आम्ही त्यांना जातीमध्ये बांधत आहोत. हे मराठ्यांचे, हे दलितांचे. हे माळ्याचे…इतका घाणेरडा विचार असलेला महाराष्ट्र मी याआधी कधी पाहिलेला नाही,” असं राज ठाकरे म्हणाले.

“इतकी मोठी माणसं आपल्याकडे जन्माला आल्यानंतर त्यांचे गुणगान गाण्याऐवजी जातीत कसले बांधत आहोत? छत्रपतींनी तर १८ पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्याची मांडणी केली होती. त्यांना आपण जातीत बांधत आहोत. लोकमान्य टिळकांना आपण ब्राह्मण म्हणत आहोत. हा महाराष्ट्र आपण कुठे नेऊन ठेवला आहे? पूर्वी दूरदर्शनला ‘आपली माती, आपली माणसं’ कार्यक्रम यायचा, त्याचं नाव बदलून आता ‘आमच्या माणसांनी केलेली आमची माती’ असं केलं पाहिजे,” असा म्हणत राज ठाकरेंनी विरोधकांवर टीका केली आहे.

हे ही वाचा:

शिवाजी महाराजांवर लवकरच सिनेमा काढणार, राज ठाकरेंची मोठी घोषणा

Congress : मला लाज वाटत नाही… गांधी परिवाराच्या ‘रिमोट कंट्रोल’ प्रश्नाला खर्गे यांचे उत्तर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss