हे सरकार घटना बाह्य आहे; आम्हाला फसवलं शेतकऱ्यांना नका फसवू- आदित्य ठाकरे

हे सरकार घटना बाह्य आहे; आम्हाला फसवलं शेतकऱ्यांना नका फसवू- आदित्य ठाकरे

आज शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आददित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र दौरा केला आणि शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी केली. ओला दुष्काळ जाहीर करावा हीच आमची मागणी असून बांधावर गेल्यावर शेतकऱ्यांचे (Farmer) दुःख कळत आहे. लोकांना जसं कृषी मंत्री माहित नाहीत तसं आम्हाला मुख्यमंत्री माहित नाहीत, ते आम्हाला दिसत नसल्याचे सांगत आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना (Eknath Shinde) टोला लगावलाय. पुण्यातील शिरुरमधील मलठण येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला. आदित्य ठाकरेंनी जमिनीवर बसून शेतकऱ्यांना धीर दिला. आताचं जे घटनाबाह्य सरकार आहे. मुख्यमंत्रिपद तुमच्याकडे ठेवलेलं आहे, आमच्या पाठीत खंजीर खूपसून तुम्ही सरकार बनवलेलं आहे. गद्दारी तुम्ही जी आमच्या सोबत केली आहे, ती माझ्या शेतकऱ्यासोबत करू नका, असा खोचक टोला माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.

परतीच्या पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज पुण्यातील शिरूर आणि जुन्नर येथील शेतीच्या पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शिरूर तालुक्यातील मलठण येथे शेतकऱ्यांशी जमिनीवर बसून संवाद साधला.

राज्याचे कृषी मंत्री कोण? ते कुठे आहेत.. असे प्रश्न आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांना विचारले आहेत. त्यानंतर शेतकऱ्यांनी त्यांना गद्दार गद्दार अशा सुरात त्यांना उत्तर दिले. राज्यातील परिस्थिती अशी असेल तर शेतकऱ्यांना न्याय कसा मिळणार ही विचार करण्याची गोष्ट आहे. कुणी जरी तुमच्या सोबत नसेल तरी शिवसेना नेहमी तुमच्या सोबत असेल. उद्धव ठाकरे ज्यावेळी मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांनी कर्जमाफी केली होती. शेतकऱ्यांना मदत पोहोचवली होती.आताच्या सरकारने तशीच मदत शेतकरी बांधवांना दिली पाहिजे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

हे ही वाचा :

महाराष्ट्राला अजून एक धक्का; वेदांत फॉक्सकॉन प्रकल्पानंतर एअरबस सी २९५ गुजरातमध्ये तयार होणार

“दारू पिता का?”,अतिवृष्टी पाहणी दौऱ्यात सत्तारांनी जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं, व्हिडिओ व्हायरल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version