हे सरकार बाळासाहेबांच्या विचारांचं, एकनाथ शिंदे

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची आज ९७ वी जयंती आहे. आज बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त मुंबईतील शिवसेना (Shivsena) भवन चारही बाजूंनी रंगीबेरंगी रोषणाईने सजले आहे

हे सरकार बाळासाहेबांच्या विचारांचं, एकनाथ शिंदे

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची आज ९७ वी जयंती आहे. आज बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त मुंबईतील शिवसेना (Shivsena) भवन चारही बाजूंनी रंगीबेरंगी रोषणाईने सजले आहे. तर जयंतीनिमित्त शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून म्हणजेच ठाकरे आणि शिंदे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. या दोन्ही गटांमध्ये चढाओढ सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. आज बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती दिनानिमित्त राजकारणातील विविध नेतेमंडळींनी त्यांना अभिवादन केले आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी बाळासाहेबांना अभिवादन केलं आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांना अभिवादन केलं आहे. आणि त्यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. हे सरकार बाळासाहेबांच्या विचारांचं आहे. सर्वसामान्य कार्यकर्ता आज बाळासाहेबांमुळेच मोठ्या पदांवर पोहचला आहे. माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता देखील त्यांच्या विचारांवर प्रभावित होऊन आणि त्यांच्या आर्शीवादामुळे पुढे आला आहे. राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आज काम करण्याची संधी मिळाली. बाळासाहेबांच्या आठवणींशिवाय एकही क्षण जात नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले. आम्ही सरकार बाळासाहेबांचे विचार, त्यांचा आदर आणि त्यांची शिकवण घेऊन चालवत आहोत. हे सर्व योगदान बाळासाहेबांचं आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे बाळासाहेबांची किर्ती देशातच नाही तर जगभरात पसरली आहे. अशा या व्यक्तिमत्वाचं तैत्रचित्राचं आज विधानभवनात अनावरण होणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी माध्यमाशी बोलताना दिली.

 

तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी देखील ट्विट (Tweet) करत बाळासाहेबांना अभिवादन केलं आहे. नरेंद्र मोदी ट्विट करत म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. बाळासाहेबांनी आपले जीवन लोकांच्या कल्याणासाठी वाहून घेतले होते. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या गप्पा आणि चर्चा नेहमी माझ्या स्मरणात राहतील. त्यांना उत्तम ज्ञान आणि वक्तृत्वाची देणगी लाभली होती, असं नरेंद्र मोदींनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

हे ही वाचा:

संजय राऊत म्हणाले, ही दोन पक्षाची युती नसून शिवशक्ती आणि भीमशक्तीची युती

अखेर शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र, उद्धव ठाकरेंची घोषणा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version