हे असंवेदनशील सरकार आहे;सरकारने थोडासा वेळ… – सुप्रिया सुळे

हे असंवेदनशील सरकार आहे;सरकारने थोडासा वेळ… – सुप्रिया सुळे

सध्या महारष्ट्रामध्ये परतीच्या पावसाने प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान केलं आहे. हातातोंडाशी आलेलं शेत परतीच्या पावसाने पूर्ण झोपून टाकलं आहे. संपूर्ण महारष्ट्रामधला शेतकरी सध्या दुखत आहे. राज्य सरकारने दिवाळीपूर्वी ओला दुष्काळ जाहीर करून मदत खात्यात जमा करावी अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती. मात्र राज्य सरकारने ओला दुष्काळाबाबत अद्याप निर्णय घेतला नाही. यामुळे विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून ही मागणी लावून धरली जात आहे आणि राज्य सरकारवर टीकाही केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “महाविकास आघाडीतील अनेक नेते हे सातत्याने ओला दुष्काळ जाहीर व्हावा अशी मागणी करत आहेत. जर सण साजरे करून किंवा भेटी जर संपल्या असतील आणि कुणाला वेळ मिळाला आणि ते जर शेतकऱ्यांच्या बांधावर गेले, तर त्यांना परिस्थिती काय आहे कळेल. राज्यात अतिशय गंभीर परिस्थिती आहे.” तर काही दिवसांपूर्वी खोके घेतल्याचा आरोप केल्याप्रकरणी बच्चू कडू यांनी थेट राजापेठ पोलिस ठाण्यात रवी राणाविरोधात तक्रार दाखल केली होती. तसेच रवी राणा यांनी केलेले आरोप सिद्ध झाले तर त्यांच्या घरी जाऊन भांडी घासेन, १ तारखेपर्यंत आरोप सिद्ध करावा, अन्यथा आपण कठोर कायदेशीर पावलं उचलणार असल्याचे संकेतही बच्चू कडू यांनी दिले होते. बच्चू कडू यांच्या पत्रकार परिषदेनंतर सुप्रिया सुळे यांनी आज माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की, बच्चू कडू हे संवेदनशील नेते आहेत. हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केल आहे. ५० खोक्यांवरून राज्यात सामान्य माणसांना शंका आहे. गावोगावी तीच चर्चा आहे. त्यामुळे त्यांनी याबद्दल खुलासा केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अजूनही संवेदनशील राजकारणी आहेत. यावर माझा विश्वास आहे.

“ हे असंवेदनशील सरकार आहे आणि मंत्रालयात येऊन आढावा घेणं, बांधावर जाऊन आढावा घेणं हे काहीच आपल्याला दिसत नाही. मला असं वाटतं कोणतरी तीन महिन्यांचा आढावा घ्यावा, की मंत्रीमंडळाच्या बैठका किती झाल्या?, मंत्रालयात कितीवेळ हे सरकार होतं?, दौऱ्यावर जेव्हा हे सरकार होतं तेव्हा ते मेळाव्यासाठी होतं की जनतेसाठी होतं?, जिल्धिकाऱ्यांचा प्रत्यक्ष कितीवेळा आढावा घेतला?, पालकमंत्री किती आढावा घेत आहेत?” असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली.

हे ही वाचा :

या गद्दारांनी खोके केवळ स्वतःसाठी ठेवलेत, मदतीला दिले नाहीत; आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणा

झुलन गोस्वामीला क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल तर्फे दिग्गज क्रिकेटपटू पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version