टिकटॉक स्टार असलेल्या भाजप नेत्या सोनाली फोगट यांचे निधन

टिकटॉक स्टार असलेल्या भाजप नेत्या सोनाली फोगट यांचे निधन

भाजप नेत्या, बिग बॉस फेम आणि टिकटॉक स्टार असलेल्या सोनाली फोगट यांचे गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याचा भाऊ वतन ढाका यांनी सोनाली यांच्या मृत्यूची बातमी दिली. सोनाली फोगट यांच्या मृत्यूची माहिती मिळताच तिचे कुटुंबीय भूतानहून गोव्याला रवाना झाले आहेत. सोनाली यांच्या लाखो चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

२०१६ मध्ये मध्ये सोनाली यांचे पती संजय फोगट देखील फार्म हाऊसमध्ये मृतावस्थेत आढळला होता. ढाका कुटुंबातील मुलगी सोनाली २२ ते २५ या वेळेत फतेहाबाद येथील भुथान खुर्द येथे पूर्वनियोजित गोवा दौऱ्यावर होती. त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर काल रात्री याचे काही व्हिडीओ आणि फोटोदेखील शेअर केले आहेत. या फोटोत त्यांनी सुंदर फेटा परिधान केला होता. पण आज सकाळच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

सर्वांचा आवडता ‘वडापाव’ झाला ५६ वर्षांचा…

कायम वादग्रस्त व्यक्त्व्यामुळे चर्चेत असणारे

शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान सोनाली यांच्या वक्तव्यामुळे चांगलीच चर्चेत आली होती. शेतकरी आंदोलनावर त्या म्हणाल्या की, शेतीविषयक कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत. शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. केंद्र सरकारने यावर खुल्या मनाने चर्चा करावी जेणेकरून शेतकऱ्यांना या कायद्यांचे महत्त्व समजेल. गेल्या वर्षी त्यांनी एका अधिकाऱ्याला चप्पलने थप्पड मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आली होती. त्याचवेळी एका गावात संबोधन करताना त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आली होती.

हेही वाचा : 

भारतातील पहिल्या महिला भौतिकशास्त्रज्ञ आणि हवामानशास्त्रज्ञ ॲना मणी यांची १०४ वी जयंती

Exit mobile version