जोपर्यंत ती पूर्ण कपडे घालणार नाही तोपर्यंत मी गप्प बसणार, चित्रा वाघ यांचा एल्गार

जोपर्यंत ती पूर्ण कपडे घालणार नाही तोपर्यंत मी गप्प बसणार, चित्रा वाघ यांचा एल्गार

मॉडेल, अभिनेत्री उर्फी जावेद (Model, Actress Urfi Javed) ही तिच्या अनोख्या फॅशन (Unique fashion) सोबतच तिच्या अनोख्या ट्विट्स (Unique tweets) मुळे देखील चर्चेत असते. तिच्या याच अनोख्या फॅशनमुळे भाजप नेत्या चित्रा वाघ (BJP leader Chitra Wagh) यांनी उर्फीवर सार्वजनिक ठिकाणी (in public places) अश्लीलता (Obscenity) पसरवत असल्याचा आरोप (Accusation) केला होता. उर्फी जावेदचा आंबोली पोलिसांत (Police) हा जबाब पाहायला मिळतो. तर यावर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून येत आहे. उर्फीवर कारवाई होईपर्यंत आणि ती पूर्ण कपडे घालणार नाही, तोपर्यंत मी गप्प बसणार नसल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटले. एका विकृतीविरोधात बोलले तर माझ्याविरोधात सगळे एकत्र येतात असा संतापही त्यांनी व्यक्त केला.

मी जे कपडे घातले ते माझ्या कामाच्या हिशोबाने घालते. त्यावरून माझं फोटो शूट होत असते. कधी कधी कपडे बदलण्याचा वेळ नसतो. त्याचवेळी कॅमेरा घेऊन आलेले लोकं माझे फोटो काढतात. ते फोटो व्हायरल होतात. ते मी कसे थांबवू. असा सवाल तीनं पोलिसांना दिलेल्या जबाबात विचारला. मागील काही दिवसांपासून चित्रा वाघ यांनी तोकडे, अश्लील कपडे परिधान करत असल्याचा आरोप करत अभिनेत्री, मॉडेल उर्फी जावेदविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. उर्फीवर कारवाई करण्यासाठी चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रारही दाखल केली आहे. तर, दुसरीकडे उर्फी जावेदने चित्रा वाघ यांच्यावर सोशल मीडियावर उपरोधिक टीका केली. त्यामुळे या दोघींमधील वाद चांगलाच पेटला आहे.

तर चौकशीनंतर उर्फीने ट्विटमधून काही प्रश्न (Question) उपस्थित केले आहेत. या ट्विटमध्ये तिने म्हटलं आहे कि,”एकीकडे यांना हिंदू राष्ट्र हवं आहे. तर दुसरीकडे स्त्रियांवर तालिबानी नियम लावून स्त्रियांच्या कपड्यांवर नियंत्रण ठेऊ पाहत आहेत. हिंदू धर्म सर्वात जुना धर्म आहे. तो स्त्रियांच्या बाबतीत उदारमतवादी म्हणून ओळखला जातो. मग तुम्ही कोणत्या संस्कृतीबद्दल बोलताय?,” असा सवाल (question) यावेळी उर्फीने केला आहे.

हे ही वाचा:

आदित्य ठाकरेंच्या आरोपाला दीपक केसरकर यांचं प्रतिउत्तर

शिवराज राक्षे ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version