spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

SHIVSENA कोण वाचवते हे येणारा काळ ठरवेल -VIJAY WADETTIWAR

विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधतांना हसन मुश्रीफ, नाशिक विरोधी संघाचा उमेदवार याबाबत भाष्य केले. मतदारांना हेलिकॉप्टर आणण्यासाठी ७० हजार कोटी रुपये हसन मुश्रीफ यांच्याकडे आहेत. ७० हजार कोटी रुपयांचा वापर करून मतदारांना हेलिकॉप्टरने आणणे, विकत घेणे हेच सध्या सुरू आहे. आता राजकारणाला धंदा समजणाऱ्याची भाषा अशीच असणार आहे. हे राजकारण समाजसेवचे व्रत आहे. यांच्या धंद्याचा चंदा व्यवसाय आहे स्वरूप त्यांनी दिला असावा हे त्यांच्या बेताल वक्तव्यावरून दिसते. निवडणूक आयोगाने चौकशी केली पाहिजे. असे मत विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. 

नाशिक विरोधी संघाच्या उमेदवाराबाबत विजय वडेट्टीवार म्हणाले की, कोणीही द्या, संघ भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या देशांमध्ये कुठली विचारधारा नाही म्हणून त्यांचे खासदार घटना बदलण्याच्या गोष्टी करतात. त्यांना संविधान बदलायचे आहे त्यासाठी ते कठल्याही स्तराला जाऊ शकतात. जहागीरदार कोणी बनवलं. मावळ्याचा सरदार केला, सरदारचा जहागिरदार केला.आता राजा होण्याचं स्वप्न पाहत आहे. ज्यांनी राजा केला त्याच्याच डोक्यावर पाय ठेवून राजा होणं अस जनता सहन करणार नाही. कोण शिवसेना वाचवते, येणारा काळ आणि जनता ठरवेल. असे मत वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री राजा का बेटा असे म्हणत व्यक्त केले. 

साक्षगंध होण्यापूर्वी त्यांनी पसंत केले होते. त्यांनी लग्नासाठी का नकार दिला, हुंड्यासाठी जे काही अपेक्षित होते त्यासाठी चर्चा करायची होती पण त्यांनी लग्न तोडलं, असे मत विजय वडेट्टीवार यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल मांडले. यासोबतच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याबाबत वडेट्टीवार म्हणाले की, भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे, सत्ता टिकवण्यासाठी कितीही सभा घेतली तरी, जनता त्याना स्वीकारणार नाही. विजय मविआचा होईल, लोकं ऐकायला जातात, पण मतदान करत नाही. गळ्याला फास लागला बिचारे काय करणार, संजयसिंगला फसवत बेजार केलं आणि आता या वयात अधिक त्रास सहन करण्यापेक्षा मानसिक त्रासामुळे बदल करण्याची भूमिका एकनाथ खडसे यांनी घेतली असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. 

हे ही वाचा:

अखेर MAHAVIKAS AGHADI चा प्रश्न मार्गी लागणार, कधी मिळणार उत्तर?

LOKSABHA ELECTIONS साठी दिव्यांग कर्मचारी करणार ‘इतक्या’ मतदान केंद्रांचे नियंत्रण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss