तिरुपती लाडू प्रकरणावरून देशभरात नव्या वादाला तोंड, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री Pawan Kalyan यांची सनातन धर्म संरक्षण बोर्ड स्थापण्याची मागणी

तिरुपती लाडू प्रकरणावरून देशभरात नव्या वादाला तोंड, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री Pawan Kalyan यांची सनातन धर्म संरक्षण बोर्ड स्थापण्याची मागणी

Tirupati Temple Prasad: सध्या तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसाद आणि लाडूंमध्ये भेसळीचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. भक्तांमध्ये वाटण्यात येणाऱ्या प्रसादात तुपाऐवजी डुक्कराची चरबी, गोमांसाची गोळी आदींचा वापर केल्याचे आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबु नायडू (CM Chandrababu Naidu) यांच्याकडून करण्यात आले आहे. हा वाद आता दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आंध्र प्रदेश सरकारकडून अहवाल मागवला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांनी आज (शुक्रवार, २० सप्टेंबर) याविषयी बोलताना आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबु नायडू यांच्याशी चारचा केली असून मंदिराच्या प्रसादाची चाचणी होईल, असे वक्तव्य केले आहे. चंद्राबाबू नायडू यांनी वायएसआर काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात तिरुपती मंदिरात दिल्या जाणाऱ्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी असलेले तूप आणि माशाचे तेल मसाल्याचा आरोप केल्यानंतर या वादाला तोंड फुटले आहे. यावर आता आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि अभिनेते पवन कल्याण (Pawan Kalyan) यांनी मोठे भाष्य केले आहे.

पवन कल्याण यांनी याबाबत आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून पोस्ट केली. यावेळी, ‘देशात सनातन धर्म संरक्षण बोर्डाची स्थापना करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणावरून देशभरात नव्या वादाला तोंड फुटल्याचे चित्र दिसत असून याचे खोल परिणाम होण्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत.

काय म्हणाले पवन कल्याण?

पवन कल्याण आपल्या ट्विटरवरून पोस्ट करत म्हंटले, “मागील सरकारच्या कार्यकाळात तिरुपती बालाजी प्रसादमध्ये प्राण्यांच्या चरबीची (माशाचे तेल, डुकराचे मांस आणि गोमांस फॅट) भेसळ झाल्याचे समोर आल्याने आपण सर्व व्यथित झालो आहोत. तत्कालीन वायसीपी सरकारने स्थापन केलेल्या टीटीडी बोर्डाला अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील! या संदर्भात, आमचे सरकार शक्य ती सर्व कठोर कारवाई करण्यास कटिबद्ध आहे.”

“परंतु, हा संपूर्ण भाग मंदिरांची विटंबना, जमिनीशी संबंधित समस्या आणि इतर धार्मिक प्रथांशी संबंधित अनेक मुद्द्यांवर गंभीर प्रकाश टाकतो. आता वेळ आली आहे की, भारतभरातील मंदिरांशी संबंधित सर्व समस्यांवर विचार करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर ‘सनातन धर्म रक्षा मंडळ’ तातडीने स्थापन केले जावे.”

“सर्व धोरणकर्ते, धर्मप्रमुख, न्यायव्यवस्था, सामान्य नागरिक, प्रसारमाध्यमे आणि आपापल्या क्षेत्रातील इतर सर्व दिग्गजांनी राष्ट्रीय पातळीवर अर्थपूर्ण चर्चा व्हायला हवी.माझा विश्वास आहे की, ‘सनातन धर्माचा’ कोणत्याही स्वरूपात होणारा अपमान थांबवण्यासाठी आपण सर्वांनी त्वरित एकत्र आले पाहिजे,” असे ते यावेळी म्हणाले.

हे ही वाचा:

तिरुपती लाडू वादावर जेपी नड्डा यांनी सीएम नायडूंशी बोलले, म्हणाले प्रकरणाची चौकशी FSSAI…

PM Narendra Modi देशातील भ्रष्टाचाराचे सरदार, गांधी कुटुंबावर बोलण्याचा त्यांना अधिकार नाही: Nana Patole

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version