… त्यांच्यावर झालेले संस्कार आज त्यांनी दाखवले, आदित्य ठाकरेंचे वक्तव्य

शिंदे-फडणवीस सरकारचं हे पहिलंच अधिवेशन आहे. आज शेवटचा दिवस असून अधिवेशनाची सांगता होणार आहे. काल अधिवेशनामध्ये सत्ताधारी पक्ष आणि विरोधक यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात धक्काबुकी झाली होती आणि वाद देखील झाली.

… त्यांच्यावर झालेले संस्कार आज त्यांनी दाखवले, आदित्य ठाकरेंचे वक्तव्य

शिंदे-फडणवीस सरकारचं हे पहिलंच अधिवेशन आहे. आज शेवटचा दिवस असून अधिवेशनाची सांगता होणार आहे. काल अधिवेशनामध्ये सत्ताधारी पक्ष आणि विरोधक यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात धक्काबुकी झाली होती आणि वाद देखील झाली. आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस असून आज देखील देखील सत्ताधारी पक्षाने आदित्य ठाकरे आणि विरोधकांवर घोषणाबाजी केली.

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर शिंदे गट व भाजप आमदारांची आदित्य ठाकरेंविरोधात घोषणाबाजी केली. आदित्य ठाकरेंच्या पोस्टर्ससह ‘५० खोके, मातोश्री ओके’, ‘युवराज दिशा भरकटले’, अशी घोषणाबाजी सत्ताधारी करत आहेत. शिंदे गटाच्या आमदारांनी थेट शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनाच लक्ष्य केलं आहे. शिंदे गटाच्या आमदारांनी विधीमंडळांच्या पायऱ्यावर आदित्य ठाकरे यांचे घोड्यावर उलट्या दिशेने बसलेल्या व्यंगचित्राचे बॅनर घेऊन घोषणाबाजी केली. बॅनरवर शिंदे गटाने ‘महाराष्ट्राचे परम पूज्य (प पु) युवराज’ असा बॅनर हातामध्ये दिसला. घोड्याचे तोंड हिंदुत्वाच्या दिशेने असून आदित्य यांचे तोंड महाविकास आघाडीकडे असल्याचे दाखवण्यात आले. वर्ष २०१४ मध्ये १५१ चा हट्ट करत युती बुडवली, २०१९ मध्ये खुर्चीसाठी हिंदुत्वाची विचारधारा पायदळी तुडवली अशी घोषणा होती.

या सर्व प्रकरणी प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मंत्रिपद मिळावं म्हणून इम्प्रेस करण्यासाठी करण्यासाठी माझ्याविरोधात घोषणा, आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. त्यांना हवी ती मंत्रिपद मिळाली नाहीत म्हणून हे सगळे इम्प्रेस करण्यासाठी चालू आहे. राज्यात खूप प्रश्न आहेत ते घेऊन पायऱ्यांवर उभे राहिले असते तर बार वाटलं असतं. मला त्यांची कीव येते आहे. मला त्यांच्याबद्दल सहानभूती आहे. मला पायऱ्यांवर आंदोलन करणाऱ्यांची कीव येते. त्यांच्या चेहऱ्यावर नैराश्य दिसत आहे. शिवसेनेला वाढता पाठिंबा मिळत असल्यामुळे त्यांची अशी परिस्थिती आहे. त्यांच्यावर झालेले संस्कार आज त्यांनी दाखवले आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच हिम्मत असेल तर राजीनामा द्या आणि जनतेतून पुन्हा निवडून दाखवा. तसेच हे सरकार अनैतिक आहे असे देखील आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

राज्यात राज्य विधिमंडळाचे अधिवेशन (Maharashtra Monsoon Session) हे १७ ऑगस्ट पासून चालू झाले आहे. आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस रंगणार आहे. विधानसभाचे पावसाळी अधिवेशन हे १७ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेतील बंडामुळं महाविकास आघाडीचे सरकार कोसळलं. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. शिंदे-फडणवीस सरकारचं हे पहिलंच अधिवेशन आहे. आज शेवटचा दिवस असून अधिवेशनाची सांगता होणार आहे.

 

हे ही वाचा :-

काल झालेल्या जोरदार वादानंतर, आज पुन्हा रंगणार अधिवेशनाचा शेवटचा दिवस

स्वाइन फ्लू: अचानक फ्लूच्या घटनांमागील कारणे काय आहेत आणि ते कसे टाळता येई

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version