spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अधिवेशनाचा आज तिसरा दिवस ; सत्ताधारी – विरोधकांचा पुन्हा एकदा रंगणार सामना

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला (Maharashtra Monsoon Session) १७ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. १७ आणि १८ ऑगस्ट रोजी दोन दिवस कामकाज चालल्यानंतर सलग तीन दिवसांच्या सुट्ट्या आल्या.

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला (Maharashtra Monsoon Session) १७ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. १७ आणि १८ ऑगस्ट रोजी दोन दिवस कामकाज चालल्यानंतर सलग तीन दिवसांच्या सुट्ट्या आल्या. यानंतर आज पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस रंगणार आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेतील बंडामुळं महाविकास आघाडीचे सरकार कोसळलं. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. शिंदे-फडणवीस सरकारचं हे पहिलंच अधिवेशन आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांचा जोरदार संघर्ष पाहायला मिळाला होता.

आज तिसऱ्या दिवशी अधिवेशनात राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत, रस्त्यांची दुरावस्था, राज्यातील कायदा सुव्यवस्था यासह अन्य मुद्द्यांवरुन विरोधक सरकारला कोंडीत पकडू शकतात. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी १७ तारखेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींचं अभिनंदन केलं. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी २५ हजार ८२६ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने प्रति हेक्टरी १३ हजार ६०० रुपये मदत देणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, विधिमंडळात सादर झालेल्या पुरवणी मागणीत याची तरतूद करण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कधी मदत मिळणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. यावरुन देखील आज तिसऱ्या दिवशी संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.

तर अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी हरिहरेश्वर येथे सापडलेल्या एके ४७ प्रकरणात उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोलीस अधिकाऱ्यांशी तातडीने चर्चा, संपूर्ण माहिती घेऊन काही वेळात देवेंद्र फडणवीस सभागृहात निवेदन केलं. मुंबई गोवा महामार्गावरुन विधानसभेत गोंधळ, मुंबई-गोवा हायवेवर अडीच वर्षात काही काम झालं नाही का? असा प्रश्न भाजपनं सेनेच्या आमदारांना विचारला, त्यावर भास्कर जाधव यांनी गेल्या 12 वर्षात हे चंद्रकांतदादा, नितीन गडकरींचं अपयश आहे का असा प्रति सवाल केला. पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे निलंबित, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत घोषणा, बीड जिल्ह्यातील अवैध धंद्यांच्या संदर्भात लक्षवेधी, फडणवीस म्हणाले, राज्यात ज्या ठिकाणी असं सुरु आहे त्या ठिकाणी कारवाई केली जाईल

 

हे ही वाचा :- 

मुंबईकरांचा खोळंबा, करीरोड स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड

लॅक्टोस इंटॉलरंट आहात? मग हे विगन दुधाचे पर्याय तुमच्याचसाठी आहेत.

Follow Us – 

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss