आज एकाचवेळी मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री बोलणार

राज्यात सर्वत्र सध्या तणावाचे वातावरण हे दिसून येत आहे. दसरा मेळवावरून शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात रस्सीघेच सुरु आहे. त्यातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहेत.

आज एकाचवेळी मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री बोलणार

राज्यात सर्वत्र सध्या तणावाचे वातावरण हे दिसून येत आहे. दसरा मेळवावरून शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात रस्सीघेच सुरु आहे. त्यातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहेत. तर दुसरीकडे आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची सभा देखील होणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भाषणावेळीच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत.

दरम्यान, आज संध्याकाळी मुंबईतील नेक्सो मैदानावर उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या गटप्रुमखांना संबोधित करणार आहेत आणि त्याचवेळी शिंदे दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. दरम्यान, दिल्लीतील पत्रकार परिषदेत शिंदे एखादी मोठी घोषणा करणार असल्याचेही सांगितले जात आहे. त्याशिवाय शिंदे यांच्या समवेत यावेळी काही महत्त्वाचे नेतेदेखील उपस्थित असणार आहेत. ते देखील काही महत्त्वाच्या घोषणा करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता शिंदे दिल्लीतून नेमकी काय मोठी घोषणा करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. उद्धव ठाकरेंच्या भाषणाच्या वेळी शिंदेंकडून एकप्रकारे खोडा घालण्याचा प्रयत्न तर केला जात नाहीये ना? असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे. तसेच ठाकरेंच्या भाषणावेळी पत्रकार परिषद घेऊन सीएम शिंदे राज्याचं आणि देशाचं लक्ष वेधणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीनंतर शिंदे पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगितले जात आहे. शिंदे सहकाही मंत्र्यांसोबत दुपारी दिल्ली दौऱ्यावर जाणार असून, यादरम्यान ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अश्वीनी वैश्णव यांची भेट घेणार आहेत. त्यांच्या भेटीनंतर शिंदे दिल्लीतील पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. मात्र, या संवादासाठी जी वेळ साधली गेली आहे. त्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

हे ही वाचा:

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात RSS चं योगदान नव्हतं,… – विद्याताई चव्हाण

हिंदूसह मुस्लिम बांधवदेखील करतात पाकिस्थानातीत ‘या’ देवीचा पूजा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version