spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आज मुंबईत महाविकास आघाडीचा महामोर्चाच्या सर्वत्र डंका, तिन्ही पक्षांकडून शक्तीप्रदर्शन

भाजपच्या (BJP) काही नेत्यांकडून महापुरुषांबद्दल करण्यात आलेल्या वादग्रस्त विधानांचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीचा महामोर्चा (MVA Mumbai Morcha) आज १७ डिसेंबरला मुंबईत काढण्यात येणार आहे. भायखळ्यातील रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनी (Richardsons & Crudas) ते टाइम्स ऑफ इंडियाच्या (Times of India) इमारतीपर्यंत या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. रिचर्ड्स अँड क्रूडास मिलपासून सकाळी १०.३० वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे. महामोर्चाची तयारी पूर्ण झाली असून ठिकठिकाणी बॅनर आणि महाविकास आघाडीचे (HallaBol Morcha) झेंडे लावण्यात आलेले आहेत.

हेही वाचा : 

Maharashtrian Pithla Recipe भाकरी सोबत घ्या गावरान पिठल्याची चव

परंतु, महाविकास आघाडीच्या या मोर्चाच्या परवानगीच्या मुद्यावरुन देखील राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं होतं मात्र, अखेर या मोर्चासाठी परवानगी देण्यात आली आहे. अनेक दिवस मोर्चाला परवानगीची प्रतीक्षा होती. आता मुंबई (Mumbai Police )पोलिसांकडून मोर्चाला लिखित परवानगी देण्यात आली आहे. भायखळा येथील पोलीस ठाण्यातून ही परवानगी देण्यात आली आहे. शिष्टमंडळाच्या भेटीनंतर अटी, शर्टींसह ही परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत, मोर्चाला परवानगी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला गेला होता. परवानगी मिळाली नाही तरी आमचा मोर्चा होणारच असा पवित्रा देखील राजकीय नेत्यांनी घेतला होता.

Shubman Gil शुभमन गिलने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले, सोशल मीडियावर चाहत्यांचे प्रेम

या महामोर्चामध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, अंबादास दानवे, अरविंद सावंत आणि इतर वरिष्ठ नेते उपस्थित राहतील. तर राष्ट्रवादीकडून विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षातील काही नेते उपस्थित असणार आहेत. तसेच, काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, भाई जगताप आणि इतर नेते उपस्थित असणार आहेत. याशिवाय, मविआच्या मोर्चाला डाव्या पक्षांचा देखील पाठिंबा असणार आहे.

सुषमा अंधारेंनी दिलं कीर्तनकार सुनिता अंधाळेंना प्रतिउत्तर

Latest Posts

Don't Miss