spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

उद्या समता पार्टी हायकोर्टात मांडणार आपली बाजू; उद्धव ठाकरेंची मशाल धोक्यात ?

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासमोरील अडचणी काही केल्या संपताना दिसत नाहीत. आधी शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर ‘धगधगती मशाल’ ठाकरेंना मिळाली, त्यानंतर ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असतानाच आता ‘मशाल’ही अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जॉर्ज फर्नांडिस यांनी स्थापन केलेल्या समता पक्षाने (Samata Party) मशाल हे आपले निवडणूक चिन्ह असल्याचा दावा केला आहे. त्यामुळं समता पार्टीनं शिवसेनेच्या चिन्हाला विरोध केला असून उद्या दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करणार आहे.

समता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल यांनी यासंदर्भात दिल्ली हायकोर्टात उद्या याचिका दाखल करणार आहेत. मंडल म्हणाले, शिवसेनेला जे मशाल निशाण दिलं आहे त्यावर माझा आक्षेप आहे. यासाठी आम्ही दिल्ली हायकोर्टात एक याचिका दाखल करणार आहोत. कारण मशाल चिन्ह ही अजूनही समता पार्टीची ओळख आहे. हे चिन्ह समता पार्टीसाठी राखीव ठेवण्यात आलं आहे. यामुळं निवडणूक आयोगानं शिवसेनेला हे चिन्ह कसं काय दिलं याचं मला आश्चर्य वाटतं आहे. यावरून समता पार्टीकडून हरकत घेत १९९४ पासून राष्ट्रीयीकृत मशाल हे चिन्ह आमचे आहे असा दावा करण्यात आलाय.

केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असं नाव वापरण्यास परवानगी दिलेली आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असं नाव मिळालेलं आहे. दुसरीकडे आयोगाने ठाकरेंना मशाल चिन्ह दिलेलं आहे. तर शिंदेंना ढाल तलवार ही निशाणी देण्यात आली आहे.

 

Latest Posts

Don't Miss