spot_img
Wednesday, September 18, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

“विकृत मानसिकता सत्ताधाऱ्यांमुळे होत असेल तर ही शोकांतिका”; Praniti Shinde यांचा सत्ताधाऱ्यांना टोला

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. प्रत्येक पक्ष दौरे करत आहेत. लोकउपयोगी योजना राबवत आहेत. त्यात आता बदलापूर सारख्या घटना राज्यात सर्वत्र घडत आहेत. एकंदरीत राज्याची स्थिती ही कठीण झाली आहे. जनतेमधील संवेदनशीलता संपत चालली आहे. एकंदरीत राज्याची स्थिती ही अतिशय नाजूक झाली आहे. या सर्व वर्दळीत राजकीय पक्ष हे निवडणुकीला लक्षात घेऊन आपली पोळी भाजून घेत आहेत. विधानसभा निवडणुकीचे राजकीय पक्षांना वेध लागलेले असल्यामुळे प्रत्येक जण कंबर कसून कामाला लागलेले दिसून येतात. सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजत आहेत. सर्वच पक्षांनी आपाआपल्या परीनं निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. या सर्वांवर भाष्य म्हणून खासदार प्रणिती शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळ त्यांनी नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांच्या विषयी, बदलापूर अत्याचार घटना, बेटी बचाव आणि सरकारची भूमिका या विषयी भाष्य केले आहे.

काय म्हणाल्या प्रणिती शिंदे ?

“आमचे नांदेडचे सहकारी खासदार वसंत चव्हाण यांचा मृत्यू झाला आहे, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. ते काल परवापर्यंत संसदेत आमच्या सोबत होते. काही दिवसांपासून ते हॉस्पिटलमध्ये होते. आज त्यांना श्रद्धांजली द्यावी लागत आहे. यावर आम्हला अजूनही विश्वास होत नाहीये. लहान ४ वर्षांच्या मुलींना ही सोडल जातं नाही, ही मानसिकता विकृत होत चाललीय. जेव्हा बलात्कार आणि अत्याचार करणाऱ्यांचे स्वागत, सत्कार केला जातो. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या जातात,तेव्हा विकृत मानसिकतेच्या शैतानांना असं वाटत की आम्ही काहीही केलं तरी सत्ताधाऱ्यांकडून आमचं स्वागत केल जाईल. अशी मानसिकता जेव्हा समाजात येते तेव्हा आपण खरचं पुढे चाललोय का असा विचार आपल्या मनात येतो. आज त्या मुलींवर किंवा महिला डॉक्टरांवर होणारे अत्याचार किमान रिपोर्ट होतायत. अनेक अशा घटना रिपोर्ट होत नाहीत, महिला पोलीस स्टेशनला यायला घाबरतात. कारण पोलीस,समाज आणि सत्ताधारी त्यांना साथ देत नाहीत. शाळा आणि कॉलेजमध्ये महिलांचा आदर सन्मान केला पाहिजे. हे शिकवलं जातं नसेल तर घरातील पती, भाऊ, वडील यांनी सांगणं गरजेचं आहे आणि तेव्हा महिलांवरील अत्याचार थांबतील. आज ‘बेटी बचावो, बेटी पढाव आहे मात्र,’बेटा पढावो आणि बेटी बचावो’ हे महत्वाचे आहे. मुलींनी काय घालावं,मुलींची वागणूक कशी असावी, सेल्फ डिफेन्स यापेक्षा मुलांना चांगली वागणूक दिली तर मूलींना हे करण्याची गरज नाही. हा सावित्री,अहिल्याबाई,रमाई, जिजाऊंचा पुरोगामी महाराष्ट्र आहे. आपल्या देशाने पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधींच्या रूपाने दिल्या आणि आज आपल्या देशात महिला सुरक्षित नसतील आणि ही विकृत मानसिकता सत्ताधाऱ्यांमुळे होत असेल तर ही शोकांतिका आहे. आता आपण हातात घेतलं पाहिजे, समाजाने हातात हात घेऊन क्रांती घडवली पाहिजे, या मताची मी आहे. मुलांना मूलींचा आदर करायला शिकवले गेले पाहिजे. पंतप्रधानांना युक्रेनला जायला वेळ आहे, मात्र मणिपुरला जायला वेळ नाही. यावरूनच समजते की, ह्या सरकारमध्ये किती संवेदनशीलता नाही.”

हे ही वाचा:

“प्रधानमंत्रांसारख्या मोठ्या माणसाला काळे झेंडे दाखवता हे सर्वथा अनुचित आहे”; Dada Bhuse यांचे मंतव्य

“ज्याला आपण मतदारांशी प्रतारणा करणं असं म्हणतो, तीच या महाराष्ट्रात झालीय”; Raj Thackeray यांचे भाष्य

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss