spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

लोकांची खोटी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न… दीपक केसरकरांची ठाकरे गटावर टीका

शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवल्यानंतर आणि पक्षाचं नाव वापरण्यावरही निवडणूक आयोगानं मनाई केल्यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर केलेल्या टीकेला शिंदे गटाचे प्रवक्ते आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवल्यानंतर आणि पक्षाचं नाव वापरण्यावरही निवडणूक आयोगानं मनाई केल्यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर केलेल्या टीकेला शिंदे गटाचे प्रवक्ते आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Shinde Group Spokesperson and School Education Minister Deepak Kesarkar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आणि नाव गोठवल्यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त करत शिंदे गटावर टीका केली. ‘खोकेवाल्या गद्दारांनी आज शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केला आहे. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही. लढणार आणि जिंकणारच! आम्ही सत्याच्या बाजूने ! सत्यमेव जयते! असे आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले.

आदित्य ठाकरे यांच्या ट्विटला प्रत्युत्तर शिंदे गटाचे प्रवक्ते आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले आहेत कि, बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्वाच्या विचारापासून लांब गेलात म्हणून आपले चिन्ह गेले, पक्ष तुमच्यापासून लांब गेला याची जाणीव आदित्य ठाकरेंनी ठेवावी असे म्हणत दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरेंवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. दीपक केसरकर म्हणाले की, लोकांची खोटी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरे करत आहेत. हे जनतेला कदापिही मान्य होणार नाही. जनतेला विकास हवा असून अडीच वर्षाच्या कालावधीत काय विकास केला याचा लेखाजोखा तुम्ही मांडू शकत नसल्याची टीकाही केसरकर यांनी केली. सत्ताकाळात आलेल्या लोकांना न भेटणे, वाईट शब्दांमध्ये बोलणे, लोकांची कामे न करणे, या सगळ्या वागण्याचे लोकांनी तुम्हाला प्रायश्चित्त दिलं असल्याची बोचरी टीका केसरकरांनी केली आहे.

हे ही वाचा:

संपलेल्या पक्षावर आम्ही बोलत नाही; ठाकरे गटाला मनसेने लगावला टोला

Shiv Sena Symbol: सर्वात मोठी बातमी! शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवलं, शिवसेना पक्षाचे नावही वापरता येणार नाही

आयोगाच्या निर्णयानंतर सुषमा अंधारेंचे सूचक ट्विट म्हणाल्या, फडणवीसजी तुम्ही जिंकलात…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss