spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शिवसेने नंतर राष्ट्रवादीला धक्का, सोलापूर मधील दोन आमदार फडणवीसांच्या भेटीला

मुंबई : शिवसेनेतील बंडानंतर आता राष्ट्रवादीलाही मोठा धक्का बसणार असल्याचे चित्र दिसत आहे. राष्ट्रवादीतील सोलापूरमधील माढ्याचे आमदार बबन शिंदे व मोहोळचे आमदार राजन पाटील या दोघांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आहेत. त्यांच्या या भेटी नंतर हे आमदार आता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या होत आहे. दरम्यान बबन शिंदे यांनाही काही दिवसांपूर्वी ईडीची नोटीस आली होती.

भाजप पक्षाने सध्या राज्यात ऑपरेशन लोटस राबवले आहे. भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षते खाली 23 जुलै शनिवारी पनवेल येथे प्रदेश कार्यकारिणीची बैठक घेत सूचना दिल्या होत्या. त्यामध्ये त्यांनी आगामी निवडणुकांच्या तयारीला लागा अशा सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे हे दोन आमदार नवी दिल्लीत फडणवीसांच्या भेटीला गेल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान आमदार बबन शिंदे यांना ईडीची नोटीस आली होती. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीची साथ सोडत भाजपचा हात धरला असा आरोप काही जणांकडून करण्यात आला आहे. या दोन्ही आमदारांनी भाजपात अधिकृत रित्या प्रवेश केल्यास त्यांची आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : 

दोन मांजरांच्या भांडणात कबुतर अचानक मध्ये आले, मग सुरू झाला ‘मजेदार खेळ’

तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पुन्हा एकदा शिवसेनेला धक्का बसला आहे. जालना मतदारसंघातील शिवसेनेचे माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी शिवसंवाद यात्रेनिमित्त युवा नेते आदित्य ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी खोतकर आदित्य यांच्यासोबत रॅलीत सहभागी झाले होते. आता शिवसंवाद यात्रा संपल्यानंतर खोतकरांनी घेतलेला निर्णय शिवसेनेसाठी धक्का देणारे ठरणार आहे.

दोन मांजरांच्या भांडणात कबुतर अचानक मध्ये आले, मग सुरू झाला ‘मजेदार खेळ’

Latest Posts

Don't Miss