spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ऍड वॉरमध्ये यु टर्न

महाराष्ट्रातल्या अनेक वर्तमानपत्रांमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाने एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीला ‘राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ असं शीर्षक देण्यात आलं आहे.

महाराष्ट्रातल्या अनेक वर्तमानपत्रांमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाने एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीला ‘राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ असं शीर्षक देण्यात आलं आहे. या जाहिरातीत शिंदे गटाने आगामी निवडणुकी संदर्भातला एक सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध केला आहे. शिंदे फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्या पासून बॅनरबाजी आणि जाहिरातबाजी ही मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. आतापर्यंत राज्याच्या राजकारणात ‘देशात नरेंद्र अन् राज्यात देवेंद्र’ अशी जाहिरात आपल्याला सतत पाहायला मिळली जाहिरातीच्या माध्यमातून शिंदे फडणवीस सरकार त्यांनी केलेल्या कामाचे दाखले देताना दिसत असतात.“राष्ट्रात मोदी महाराष्ट्रात शिंदे” या जाहिरातीने मंगळवारी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा वादंग निर्माण झाला. शिंदे गटाच्या या जाहिरातीमुळे शिंदे-फडणवीस युतीत आता चांगले संबंध राहिले नसल्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या. शिंदे गटाने केलेल्या या जाहिरातीत फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच छायाचित्र असल्यानेही आरोप प्रत्यारोप झाले.

राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांना दिलेल्या या जाहिरातीमुळे जनमाणसांत राज्य सरकारविषयी निर्माण झालेला संभ्रम दूर करण्याकरता आज शिंदे गटाने डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. आजही त्यांनी राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांना जाहिरात देऊन “राष्ट्रात मोदी महाराष्ट्रात शिंदे” या जाहिरातीला “जनतेच्या चरणी माथा, गर्जा महाराष्ट्र माझा” या जाहिरातीने उत्तरार्ध केला आहे. या जाहिरात प्रकरणावरून दिवसभर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटाच्या नेत्यांनी जाहिरातीमधील दाव्याचं समर्थन केलं. तर, भाजपाकडून या जाहिरातीला उघड विरोध करण्यात आला. त्याचबरोबर या जाहिरातीवर बाळासाहेब ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांचा फोटो नसल्याने शिंदे गटाकडून दबावतंत्र वापरलं गेलं असल्याचं बोललं गेलं. दरम्यान, काल रात्री उशिरा शंभूराज देसाई यांनी या जाहिरातीबाबत मोठा खुलासा केला. “आजच्या वर्तमानपत्रात छापून आलेल्या जाहिरातीचा शिवसेनेच्या शिंदे गटाचा काहीही संबंध नाही. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या हितचिंतकांनी ही जाहिरात दिली असावी”, असं स्पष्टीकरण देसाई यांनी दिलं आहे.

‘राष्ट्रात मोदी महाराष्ट्रात शिंदे’ या जाहिरातीवरून मोठा वादंग निर्माण झाल्यानंतर डॅमेज कंट्रोल करण्याकरता आज पुन्हा अनेक वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात देण्यात आली आहे. ‘जनतेच्या चरणी माथा, गर्जा महाराष्ट्र माझा’च्या जाहिरातीच्या माध्यमातून भाजपा-शिवसेना या डबल इंजिन सरकारच्या लोकप्रियतेचा पाढा वाचण्यात आला आहे. एवढंच नव्हे तर लोकप्रियतेच्या बाबतीत विरोधकांना मिळालेली टक्केवारीही यातून देण्यात आली आहे. जनतेचा शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्त्वाला ४९.३ टक्के आशीर्वाद तर, प्रमुख विरोधक २६.८ टक्के आणि अन्यांना २३.९ टक्के पसंती मिळाल्याचे या जाहिरातीत नमूद आहे. देशाच्या विकासाची दिशा देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाला ८४ टक्के नागरिकांची पसंती; डबल इंजिन सरकारमुळेच राज्याच्या विकासाला गती येत असल्याचे ६२ टक्के नागरिकांचे मत; ४६.४ नागरिकांची भाजपा-शिवसेनेला पसंती, प्रमुख विरोधक ३४.६ टक्के, अन्य १९ टक्के; अशीही माहिती या जाहिरातीतून देण्यात आली आहे.त्यामुळे आता आजच्या नवीन जाहिरातीमुळे आता पुन्हा चर्चाना उधाण येणार आहे आणि त्याचबरोबर या जाऊ नवीन जाहिरातीवर देखील विरोधी पक्षातील राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात होणार आहे हे नक्की आहे.

हे ही वाचा:

खासदार श्रीकांत शिंदे दिल्लीला रवाना

गुजरातमध्ये हाय अलर्ट जारी; २४ तासांत धडकणार चक्रीवादळ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss