spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘एकनाथ शिंदेंच्या सभा या बाळासाहेबांच्या आहेत की काय, असा भास होतो’ उदय सामंतांचे व्यक्तव्य

शिवसेनेचा ठाकरे गट आणि शिंदे गटातील वाद आता चांगलाच विकोपाला गेला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शिवसेना पक्षचिन्ह कोणाकडे असेल याबाबत निर्णय हा निवडणूक आयोगाचा असणार आहे. यामुळे नक्कीच शिंदे गटाला दिलासा मिळाला आहे. परंतु या दोन्ही गटात दसरा मेळाव्यावरुन सध्या सामना सुरु असून आमचाच दसरा मेळावा खरा असल्याचा दावा दोन्ही गटांकडून केला जात आहे. शिंदे गटानेही दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरु केली आहे. तत्पूर्वी मुंबईत शिंदेगटाच्या शिवसेनेचं संपर्क अभियान सुरू आहे. या संपर्क अभियानात बोलताना उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं कौतुक केलं आहे. तसेच, एकनाथ शिंदेंच्या सभांना होणारी गर्दी पाहून बाळासाहेबांच्या सभांचा भास होतो, असे उदय सामंत यांनी आपले मत व्यक्त केलं.

हेही वाचा : 

विक्रम वेधा रिलीज होण्यापूर्वी सैफने मांडले आपले विचार म्हणाला ‘ मी जरा डाव्या विचारसरणीचा…

सामंत यांनी म्हटले, महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंच्या सभेला जी गर्दी होते, ती स्वर्गीय बाळासाहेबांच्या सभेसारखी असते. म्हणूनच एकनाथ शिंदेंच्या सभा या बाळासाहेबांच्या आहेत की काय, असा भास होतो, कारण एवढी लाखो लोकांची गर्दी सभांना होत आहे, असे म्हणत सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभेची तुलना बाळासाहेबांच्या सभेसोबत केली. तसेच, आदित्य ठाकरेंच्या सभेवर नाव न घेता टिका केली. आमच्याकडे दापोलीला काहीजण सभेसाठी आले होते, एखादा कोपरा पाहायचा, राष्ट्रवादीचे लोकं भगवा झेंडा घेऊन जमवायचे आणि आम्हाला शिव्या द्यायच्या, असे म्हणत सामंत आदित्य ठाकरेंच्या सभेवर टिका केली.

उदय सामंतांची अंबादास दानवेंवर टीका

अंबादास दानवे म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे आणि ४० आमदारांना ते लक्ष्य करत आहेत. बुधवारी रात्री दानवे यांनी ठाण्यातील टेंभी नाका येथील देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना, आपण ४० महिशासुरांचे मर्दन करण्याची मागणी देवीपुढे केल्याचं ते म्हणाले होते. यासंदर्भात मंत्री उदय सामंत यांना प्रश्न विचारला असताा, असे अनेक अंबादास दानवे मी झेपवले आहेत, असे सामंत यांनी सांगितले.

‘भगवा झेंडा हातात नसून हृदयात असावा’, उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा

मला काही फरक पडत नाही मी असे अनेक अंबादास दानवे झेपवले आहेत. दुसऱ्याचे वाईट व्हावे म्हणून देवीकडे प्रार्थना करणाऱ्या माणसाकडे देव बघत असतो, की हा किती वाईट आहे. देव त्याचेच वाईट करतो, असे प्रत्युत्तर उदय सामंत यांनी अंबादास दानवेंना दिले. तसेच, दानवेंनी त्यांचं विधान परिषदेचे पद जितकी वर्ष आहे ते सांभाळावं, त्यांचे विचार त्यांनी पोहोचवावे. देवी त्यांना चांगली बुद्धी देवो हीच माझी प्रार्थना, असे उपरोधात्मक टोलाही सामंत यांनी लगावला.

टीम इंडियाला मोठा धक्का, वर्ल्ड कपमधून जसप्रीत बुमराह आऊट

Latest Posts

Don't Miss