लोकशाहीत विचार बदलला म्हणून काय ठार माराल…; हल्ल्यानंतर उदय सामंतांची संतप्त प्रतिक्रिया

लोकशाहीत विचार बदलला म्हणून काय ठार माराल…; हल्ल्यानंतर उदय सामंतांची संतप्त प्रतिक्रिया

हल्ल्यानंतर उदय सामंतांची संतप्त प्रतिक्रिया

मुंबई : शिंदे गटातील बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर काल रात्री शिवसैनिकांनी कात्रज चौकात हल्ला केला. शिवसैनिकांनी सामंत यांच्या गाडीभोवती घेराव घातला, दगडफेकीत सामंत यांच्या गाडीची काच फुटली. पुण्यातील कात्रज भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका कार्यक्रमासाठी आले होते. कात्रज भागात शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची सभा मंगळवारी रात्री पार पाडली. शिंदे यांच्यासह सामंत आले होते त्यावेळीच हा हल्ला झाला. मात्र आता या हल्ल्यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर सामंत यांनी थेट शिवसेनेला इशारा दिलाय. सामंत यांनी ट्विटरवर व माध्यमांशी बोलताना प्रकरणाचा खुलासा करत इशारा दिला आहे.

उदय सामंत हल्ल्याप्रकरणी पुण्याचे शिवसेना शहर प्रमुकांसह पाच जणांना अटक

सामंत यांनी आपल्या ट्विटर हान्डेलवरुन म्हटले, “गद्दार म्हणता तरी शांत आहे. शिव्या घालता तरी शांत आहे. आई वडिलांना शिव्या घातल्यात तरी शांत आहे. लोकशाहीत विचार बदलला म्हणून काय ठार माराल. शांत आहे म्हणजे हतबल आणि असाह्य नाही. काळ ह्याला उत्तर आहे. अंत पाहू नका,” असे ट्विट करत उदय सामंत यांनी शिवसेनेला इशारा दिला.

हेही वाचा : 

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी, शिवसेनेकडून प्रतिज्ञापत्र दाखल

Exit mobile version