spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

बेळगावमध्ये महाराष्ट्राच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्या संधर्भात उदय सामंतांची प्रतिक्रिया

बेळगावमधील (Belgaum) हिरबागेवाडी (Hirbagewadi) टोलनाक्यावर (toll booth) महाराष्ट्राच्या (Maharashtra) वाहनांवर (vehicles) हल्ला करण्यात आला आहे. कन्नड रक्षण वेदिकेच्या (Kannada Rakshana Vedike) कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला आहे. बेळगावात महाराष्ट्राच्या १० वाहनावर हल्ला करण्यात आलाय. कन्नड रक्षण वेदिका महाराष्ट्रविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पेटण्याची शक्यता आहे. यावर शिंदे गटाचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे मंत्री उदय सामंत (Uday Samantha) यांनी माध्यमांशी संवाद साधतांना त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक (stone throwing) झाली असेल तर ही निषेधार्ह (objectionable) बाब आहे. मी याचा जाहीर निषेध करतो. सीमावाद सुप्रीम कोर्टात (Supreme Court) असून, प्रत्येक राज्याने आपली बाजू भक्कमपणे मांडली पाहिजे. हीच भूमिका महाराष्ट्र सरकारने घेतली आहे. असं असताना महाराष्ट्रातील जनतेच्या सहनशक्तीचा कोणी अंत पाहू नये अशी माझी विनंती आहे,” असं उदय सामंत म्हणाले आहेत. पुढे ते म्हणाले की “कर्नाटक सरकारने यामध्ये तातडीने लक्ष घातलं पाहिजे. हल्ला करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी. आपण एका देशात राहत असून, सीमावाद सुप्रीम कोर्टात आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारने सुप्रीम कोर्टाचा निर्णय मान्य असेल अशी भूमिका घेतली पाहिजे. पण गेल्या काही दिवसांपासून जे उकसवायचं काम सुरु आहे ते बंद केलं पाहिजे. तसंच संबंधितांवर कडक कारवाई करावी. यासंबंधी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील”.

महाराष्ट्राचे मंत्री बेळगावात येण्याची शक्यता पाहून कन्नड रक्षण वेदिका संघटना आक्रमक झाली आहे.या संघनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावच्या चौकात रास्तारोको केला. तसंच रस्त्यावर लोळण घेत वाहने अडवली. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि महाराष्ट्र सरकारविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात येऊ देऊ नका, अशी मागणी कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे (District Collector) केलीय. तर महाराष्ट्राच्या मंत्र्यांना आणि खासदारांना बेळगावात प्रवेश दिला जाणार नाही, असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा : 

Divya agarwal वरुण सूदपासून विभक्त झाल्यानंतर दिव्या अग्रवाल बनली ‘या’ उद्योगपतीची लाईफ पार्टनर

Maharashtrian Wedding Rukhawat |लग्नासाठी सुंदर रुखवत बाजारात उपलब्ध

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss