आदित्य ठाकरेंच्या आरोपाला उदय सामंत यांच प्रतिउत्तर

आदित्य ठाकरेंच्या आरोपाला उदय सामंत यांच प्रतिउत्तर

शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर सडकून टीका केली. राज्यातील वेदांता फॉक्सकॉन आणि टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला स्थलांतरीत होण्यामागे राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्या सर्व आरोपांना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन कागदपत्रे सादर करत उत्तरे दिली. टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्रात यावा यासाठी गेल्या सरकारकडून नेमके काय प्रयत्न झाले याचा कागदपत्रांसह पुरावा सादर करा, असं आव्हानच उदय सामंत यांनी आदित्य ठाकरेंना दिलं.

२५३६८ कोटींच्या १० प्रकल्पांना मागील तीन महिन्यात आम्ही मान्यता दिली, त्यामुळे रोजगार निर्मिती होणार आहे. कॅबिनेट सब कमिटीची बैठक झाली आणि आम्ही या प्रकल्पांना मान्यता दिली, असे राज्याचे उदयोगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. उदयोगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. एअरबस आणि वेंदाता प्रकल्पाबाबत काही कागदपत्र त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवत महाविकास आघाडीवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी दोन्ही प्रकल्प महाराष्ट्रातच राहावेत, यासाठी महाविकास आघाडी सरकारने कोणतेही प्रयत्न केले नसल्याचा आरोपही केला. सरकार गेल्यानंतर राग असू शकतो. पण राग किती काढायचा? यालाही बंधने आहेत. एअरबसच्या बाबात सरकारची बैठक झालीच नाही. स्थानिक अधिकाऱ्यांबरोबर चर्चा सुरु होती, असे आयएस अधिकारी सांगू शकतो. आदित्य ठाकरे यांना सरकार गेल्याचा राग आहे, असेही यावेळी सामंत यांनी सांगितलं.

“आदित्य ठाकरे यांच्या आजच्या पत्रकार परिषदेने कोकणातील एक संभ्रम दूर झाला. माजी मंत्री सुभाष देसाई यांनी नाणारला रिफायनरी प्रकल्प रद्द झाल्यानंतर तो प्रकल्प पुन्हा एकदा व्हावा, असं पत्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिलं. आता ही रिफायनरी जर झाली तर ती तुम्ही आणली नाही तर आम्हीच आणली, असं त्यांनी जाहीर केलंय. पण उद्या तिथल्या स्थानिक शिवसेनेच्या खासदारांना रिफायवनरी प्रकल्पाबाबत विचारलं तर त्यांचा आजही त्याला विरोधच आहे. तिथले स्थानिक आमदार रिफायनरी मागत आहेत. रिफायनरीचे अजून पॅकेज जाहीर व्हायचं राहिलं आहे. अनेक गोष्टी व्हायच्या आहेत”, असं म्हणत उदय सामंत यांनी नाणार प्रकल्पाचाही विषय या प्रकरणात खेचला.

हे ही वाचा :

Civil Code : गुजरातमध्ये समान नागरी संहिता लागू करण्यासाठी समिती स्थापन केली जाईल, मुख्यमंत्री पटेल यांचा निर्णय

उद्धव ठाकरे औरंगजेबाचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम करत;आशिष शेलार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version