spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

उदयनराजेंची आझाद मैदानात आंदोलनाची घोषणा, ‘पुढे काय होईल ते बघून घेऊ’

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापल आहे. राज्यपालांनी केलेल्या या वक्तव्याचा संपूर्ण महाराष्ट्रातून जाहीर निषेध केला जात आहे. ठिकठिकाणी राज्यपालांच्या विरोधात आंदोलन केली गेली होती. तर आता या वादात छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांनी ठोस भूमिका घेतली आहे. उदयनराजे भोसले यांनी आज रायगडावर शिवसन्मानाचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात उदयनराजे भोसले यांनी राज्यपालांवर हल्लाबोल करत मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.

आज छत्रपती उदयन राजे भोसले यांच्या तर्फे किल्ले रायगड येथे निर्धार शिवसन्मानाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. उदयनराजे भोसले यांनी सांगीतल आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांइतकेच त्यांच्या वक्तव्यावर शांत बसणारे देखील तितकेच मोठे दोषी आहेत. राज्यपालांच्या वक्तव्यावर नेते का बोलत नाही असा सवालही उदयनराजे भोसले यांनी विचारला आहे. तसेच शिवाजी महाराजांचा अपमान वारंवार केला जात असल्याचे उदयनराजे यांनी म्हटले आहे. उदयनराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांना लाज कशी वाटत नाही असा सवाल करत उदयनराजे भोसले यांनी टोला लगावला आहे. तसेच त्यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्य स्थापन केले. प्रत्येक जाती, धर्माचा सन्मान करण्याची शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. त्याच, शिवरायांचा अपमान सुरू असल्याचे उदयनराजे यांनी म्हटले.

उदयनराजे यांनी राज्यपालांना निशाणा करत सांगितलं की, “सध्या जाती धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी शिवरायांचा अपमान करणाऱ्या लोकांना पाठीशी घातलं जात आहे. जे शिवरायांचा अपमान करत आहेत आणि जे महाराजांचा अवमान करणाऱ्यांना पाठिंबा देत आहे आणि देतील ते सुद्धा तेवढेच दोषी आहे. एक मूठभर लोकांमुळे देशाच वाटोळं होत आहे. स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी लोकांच्या विचारात बदल करण्याचा प्रयत्न लाज वाटली पाहिजे”,असे म्हणत उदयनराजे भोसले यांनी खडेबोल लगावले आहे. तर उदयनराजे भोसले यांनी पुढे सांगितलं आहे की, ” शिवाजी महाराजांचा अवमान करू नका हे सांगावं लागेलं याची गरज वाटेल नाही. महापुरुषांचा अवमान सहन करणार नाही. संपूर्ण महाराष्ट्रात नियोजन बद्ध कार्यक्रम राबवणार आणि शिवाजी महाराजांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणार” असे उदयनराजे भोसले यांनी सांगितलं आहे. तसेच खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितलं की “सर्वांना लवकरच एक तारीख दिली जाईल या दिवशी सर्वांनी आझाद मैदानावर एकत्र जमायचं ” असे म्हणत खासदार उदयनराजे भोसले यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाची घोषणा केली आहे.

राज्यपाल सगळ्यात मोठं पद आहे . पद मोठा आहे माणूस मोठा नाही स्वतःच्या स्वार्थासाठी राज्यपालाला मागे टाकलं जात आहे. शिवाजी महाराजांचा अपमान सर्वांचा आहे . जाती धर्मामध्ये तेढ निर्माण केली जाते आहे. जनतेमुळे नेते आहेत नेत्यांमुळे जनता नाही. जे राज्यपालांचे समर्थन करतील त्यांना जागा दाखवली जाईल. जे महाराजांचा अवमान करणार्यांना पाठिंबा देतील ते सुद्धा दोषी आहे. एक मूठभरलोकांमुळे देशाचा वाटोळं होत आहे. स्वतःच्या राजकीय फायद्यासाढी लोकांच्या विचारात बदल करताना लाज वाटली पाहिजे, शिवाजी महाराजांचा अवमान करू नका बोलण्याची घराज नाही, महापुरुषांचा अवमान सहन करणार नाही. उदयन राजे सम्पूर्ण महाराष्ट्रात नियोजन बद्ध कार्यक्रम राबवणार शिवाजी महाराजांबद्दल विचार लोकांपर्यंत पोहोचवणार. राज्यपालांवर ठामपणे कोणच का नाही बोलत? राज्यपालांच्या विरोधात उदयन महाराज आझाद मैदानावर जाणार आहेत तारीख ठरवली जाईल , आझाद मैदानात आंदोलनासाठी लवकरच तारीख ठरवणं उदयन राजे. पुढे काय होईल ते बघून घेऊ,

हे ही वाचा : 

संजय राऊतांनी सुनावले खडेबोल, सोलापुरात कर्नाटक भवन बांधणार असाल तर

हिटलरने जगाला अनेक चांगल्या गोष्टी दिल्या, कान्ये वेस्टने केला दावा

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss