उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र येण्यातच सर्वांचं हित – दिपाली सय्यद

सेनेत दोन गट नको सर्वांची हीच भावना असं दिपाली सय्यद म्हणाल्या

उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र येण्यातच सर्वांचं हित – दिपाली सय्यद

दिपाली सय्यद लाईव्ह

मुंबई : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये समेट व्हावा, म्हणून आपण भेट घेतल्याचं त्यावेळी दिपाली सय्यद यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. आज एक ट्विट करत लवकरच एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असे त्यांनी आपल्या ट्विट मधून सांगितले. आज पत्रकार परिषद घेत दिपाली सय्यद यांनी आपली याबाबत भूमिका मांडली आहे.

मी मनातली भावना बोलून दाखवली
शिवसेना ही इतकी मोठी संघटना आहे त्यात असे गट पडले आहेत ते नको अशी माझी भावना आहे. तीच भावना ट्विटर मी वर बोलून दाखवली. मी जे जाणवलं ते बोलून दाखवलं. दोघांना ही एकत्र यायचं आहे हे आम्हाला जाणवतंय. आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि आदरणीय उद्धव ठाकरे साहेब यांनी जर पुढाकार घेतला तर आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांना आनंद होईल. मला सेनेत दोन गट नको आहेत. आमची भावना मांडण्याचा अधिकार आम्हाला आहे त्यामुळे मी माझं मत मांडलं. असं दिपाली सय्यद म्हणाल्या.

 

दोघांनी एकत्र येण्यातच सर्वांनाचं हित
तुटलेलं घर पुन्हा एकत्र जोडलं जावं हीच माझी इच्छा आहे. बाळासाहेबांची शिवसेना एकत्र रहावी हाच यामागील उद्देश आहे. एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर शिवसेनेकडून तुमच्यावर कारवाई केली तर तुम्ही शिंदे गटात जाणार का असा सवाल पत्रकारांनी विचारला त्यावर दिपाली सय्यद म्हणाल्या, माझ्यावर कारवाई होण्याचा चा प्रश्न च उद्भवत नाही. मी मध्यस्थी करण्याची भूमिका घेतली आहे. दोघांच्यात वाढलेल्या दरीमुळे शिवसेनेतील लहान लहान कार्यकर्ते यात होरपळले जात आहेत हे त्यांनी लक्षात घ्यावं हीच माझी इच्छा आहे. माझं शिवसेनेतील सर्व कार्यकर्त्यांना आवाहन आहे की त्यांनी ही पुढे येऊन आपल्या मनातील इच्छा व्यक्त करावी. तुम्ही बोललात तर हे शक्य होईल. सगळ्यांनी एकत्र येण्यातच सर्वांचं हित आहे.

हेही वाचा

एकनाथ शिंदे घेणार उद्धव ठाकरेंची भेट; दिपाली सय्यदांचे मोठे वक्तव्य

 

येत्या दिवसात एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचं शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी ट्विट केलं होतं. त्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आज पत्रकार परिषद घेत दिपाली सय्यद यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

Exit mobile version