spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची अखेर झाली भेट

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर (Uddhav Thackeray and Prakash Ambedkar) यांच्यात युतीसाठी (alliance) अनेकदा बैठक पार पडली आहे. राज्यात पुन्हा एकदा शिवशक्ती (Shiva Shakti) आणि भीमशक्तीच्या (Bhimashakti) प्रयोगाची चाचपणी सुरू झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यातील बैठक संपली आहे. राज्यात लवकरच शिवशक्ती-भीमशक्ती एकत्रित दिसण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यात आगामी महानगरपालिकेच्या (Municipal Corporation) दृष्टीने खलबतं सुरु आहेत. आज मुंबईतील हॉटेल ग्रँडमध्ये (Hotel Grand) दोन पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या चर्चा झाली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या रुपाने महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) चौथा पक्ष एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे.

ही बैठक सुमारे दोन तास सुरू होती. मुंबईतील ‘ग्रॅण्ड हयात’ मध्ये ही बैठक सुरू होती. आगामी मुंबई महापालिका (BMC Election) आणि इतर महापालिका निवडणुकीतील आघाडीच्या अनुषंगाने ही चर्चा झाली असल्याची माहितीमिळत आहे. या बैठकीत शिवसेना ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर, खासदार विनायक राऊत उपस्थित होते. तर, वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर, सुजात आंबडेकर (Sujat Amdekar) आणि इतर महत्त्वाचे पदाधिकारी हे उपस्थित होते. सुजात आंबेडकर यांनी आपण बैठकीत उपस्थित नसल्याचे म्हटले.

या बैठकीत प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे जागा वाटपाबाबत चर्चा केली असल्याची माहिती मिळाली आहे. आगामी काळात प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) आणि काँग्रेस (Congress) यांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजीदेखील उद्धव ठाकरे यांना घ्यावी लागणार आहे. त्यादृष्टीने देखील या बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हे ही वाचा : 

‘वेड’ सिनेमातील ‘बेसुरी’ गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीस

सोनाली कुलकर्णीचे लंडन मधील काही खास फोटो

 

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss