spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकरांची आज पुन्हा भेट होणार, युतीचा निर्णयावर शिक्कामोर्तब?

zशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) एका कार्यक्रमात प्रकाश आंबेडकराना (Prakash Ambedkar) युती करण्याची जाहीररित्या साद घातली. त्याला काही दिवसात प्रतिसाद देत वंचित बहुजन आघाडीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत युती करण्याचा प्रस्ताव मान्य असल्याचं वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी जाहीर केले. त्यामुळे आगामी निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी (vanchit bahujan aghadi) आणि शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे हे युतीत लढणार हे स्पष्ट झाले आहे. शिवशक्ती आणि भिमशक्तीचा प्रयोग याआधीही करण्यात आला होता. त्याचा कितपत फायदा झाला? वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमची युती दीर्घकाळ टीकलेली दिसली नाही. मात्र आता पुन्हा एकदा आगामी काळात वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गट एकत्र येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. अशावेळी आज संध्याकाळी पार पडणाऱ्या महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) बैठकीला ठाकरे गटातील नेते उपस्थित राहणार का हा देखील एक सवाल आहे.

हेही वाचा : 

अभिनेत्री सायली संजीवने ऋतुराज बद्दल केला खुलासा पहा काय म्हणाली सायली

आगामी निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचा ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी एकत्र येणार असल्याची घोषणा वंचितकडून करण्यात आली. त्यानंतर आज वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गट यांची आज पहिली बैठक होणार आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात आज दुपारी मुंबईत चर्चा होणार आहे. मात्र प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरेंसोबत युती करण्याआधी महाविकास आघाडीमधील वंचितच्या स्थानाबाबत भूमिका स्पष्ट करण्यास सांगितलं होतं. त्याबाबत ठाकरे गट आता काय निर्णय घेणार हे पाहावं लागेल. दुसरीकडे आंबेडकर आणि ठाकरे यांचं ठरत असताना शिंदे गटही प्रकाश आंबेडकर यांना आपल्याकडे आणण्याचे प्रयत्न करत असल्याचं कळतं.

Datta Jayanti 2022 तुम्हाला माहित आहे का त्रिमुर्ती प्रभु दत्तात्रेय उदयास कसे आले ?

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीनंतर सकारात्मक निर्णय झाल्यावर राज्यात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र आल्यास शिंदे फडणीवस यांची चिंता वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, शिवसेना ठाकरे गट वंचित सोबत राजकीय आघाडी करताना महाविकास आघाडीतील मित्र पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीसंदर्भात उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

Oats चेहऱ्यावरील त्वचेसाठीही फायदेशीर, अशा प्रकारे वापरून बघा

Latest Posts

Don't Miss