spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज एकाच मंचावर येणार ?

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची आज ९७ वी जयंती आहे. हा दिवस सर्व शिवसैनिक तरी साजरा करतातच पण त्या साबोत संपूर्ण देशभरात आज बाळासाहेबांची जयंती मोठ्या प्रमाणत साजरा केला जातो. राज्यात आज शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या युतीची (Alliance of Shivashakti and Bhimshakti) घोषणा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former Chief Minister Uddhav Thackeray) आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत. आज ही मोठी राजकीय घटना घडत असतानाच आणखी एक मोठी राजकीय घटना घडणार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर येणार आहेत. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीकडेही संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

विधान भवनाच्या पाचव्या मजल्यावरील मध्यवर्ती सभागृहात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात येणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने हे अनावरण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्या हस्ते हा अनावरण सोहळा पार पडणार आहे.

या सोहळ्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former Chief Minister Uddhav Thackeray) आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांनाही निमंत्रित करण्यात आलं आहे. त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने सत्तांतरानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर येणार आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यांदाच एकाच मंचावर येणार आहेत. एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज ठाकरे हे चारही नेते पहिल्यांदाच एकाच मंचावर येत असल्याने याकडेही सर्वच राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

हे ही वाचा:

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी ‘सामना’तून शिंदे गटावर जोरदार टीका

 

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss