spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नितीश राणेंच्या निशाण्यावर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत

आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात आली आहे. सामनाच्या अग्रलेखात व्लादीमीर पुतीन आणि वॅगनर ग्रुपचाही उल्लेख केला आहे.

आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात आली आहे. सामनाच्या अग्रलेखात व्लादीमीर पुतीन आणि वॅगनर ग्रुपचाही उल्लेख केला आहे. आजच्या लेखामधून मोदींवर निशाणा साधण्यात आला आहे. याला भाजपचे नेते नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ठाकरे गटाचे खासदार आणि नेते संजय राऊत यांच्यावर नितेश राणे यांनी निशाणा साधला आहे. नितेश राणे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, संजय राऊतला वॅगनर ग्रुपचा इतिहास माहीत तरी आहे काय? थोडी माहिती घेतली असती तर विरोधकांच्या पटना बैठकीला वॅगनर ग्रुप म्हणायची हिंमत झाली नसती. संजय राऊत घरफोड्या आहे. वॅगनर ग्रुपचा लीडर नाझी विचारसरणीचा होता.संजय राऊतला पाटण्यात भेटलेले मित्र पक्ष आणि त्याचे नेते पण नाझी विचारसरणीचे आहेत असं त्यांना म्हणायचं आहे का?,असा सवाल नितेश राणे यांनी विचारला आहे.

नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंना पूर्वी किती मानसन्मान मिळायचा आणि पाटण्यात किती मिळाला? एका कोपऱ्यात मेहबूबा मुफ्तीच्या बाजूला उद्धव ठाकरेला बसवण्यात आलं होतं. उद्धव ठाकरे आणि कुटुंबीयांचा इतिहास आहे. जे जे त्यांना आडवे आले त्यांना त्यांनी संपवलं आहे, असा गंभीर आरोपदेखील नितेश राणे यांनी केला आहे. आदित्य ठाकरे स्वतः सूरज चव्हाणला भेटायला गेले. दिशा सालियानच्या हत्येनंतर काही लोक सुशांत सिंगला भेटायला गेले होते. भेट झाल्यानंतर काहीच दिवसात सुशांत सिंगची हत्या झाली.असंच काही सूरज चव्हाण बाबत घडणार नाही ना?, असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.

सामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. पुतीन यांनाही धक्का दिला जाऊ शकतो व हुकूमशहाची घाबरगुंडी उडते हे वॅगनर बंडाच्या रूपाने जगाने पाहिले आहे. अर्थात कोणत्याही हुकूमशाहीला असा हादरा कधी ना कधी बसत असतो . पुतीन असो की मोदी , त्यांना बंडाचा सामना करावाच लागतो . हिंदुस्थानातील सत्ता ही अहिंसक ‘ वॅगनर ‘ मार्गानेच उलथवली जाईल व तो मार्ग मतपेटीचा आहे . पाटण्यात मोदी यांच्या सत्तेस आव्हान देणारा लोकशाही संरक्षक ‘ वॅगनर ग्रुप ‘ एकत्र आला . हा ग्रुप भाडोत्री नाही हे महत्त्वाचे . पुतीन यांच्याप्रमाणेच मोदी यांना जावे लागेल , पण लोकशाही मार्गाने . पाटण्यातील ‘ वॅगनर ग्रुप ‘ ने तोच इशारा दिला!, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.

हे ही वाचा:

घरच्या घरी वापरली जाणारी मोहरी ठरते Bad Cholesterol वरील रामबाण उपाय

शाहिद कपूरचा ‘ब्लडी डॅडी’ चित्रपट थिएटरमध्ये नाही दाखवणार ; निर्मात्यांनी कारण सांगितले ….

महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीसांचे भ्रष्ट सरकार उखडून टाका व काँग्रेसची सत्ता आणा, सिद्धरामय्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss