spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Sanjay Raut : ‘फोनवर बोलताना उद्धव ठाकरेंच उर भरुन आला, मलाही भरुन आलं’, संजय राऊत भावुक

शिवसेना खासदार संजय राऊत मागील जवळपास १०० दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत होते. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने त्यांना अटक केली होती. काल अखेर त्यांना जामीन मिळाला आहे. जामीन मिळाल्यानंतर बुधवारी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास संजय राऊतांची ऑर्थर रोड कारागृहातून सुटका झाली आहे. यानंतर ते आपल्या भांडुप येथील घरी पोहोचले आहेत. याठिकाणी शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं आहे. घरी पोहोचल्यानंतर केलेल्या भाषणात संजय राऊतांनी विरोधकांना आव्हान केलं परंतु राऊत तितकेच भावुक पण झाले होते. संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंसोबतचा अतिशय भावनिक प्रसंग सांगितला.

“जेलमधून सुटल्यावर मला उद्धव ठाकरेंचा फोन आला. माझ्याशी बोलले. यावेळी त्यांचा उर भरुन आला. मलाही भरुन आलं, शिवसेना हा परिवार आहे. रस्त्यात जिथून जिथून मी जात होतो त्या प्रत्येक ठिकाणी लोक थांबून मला अभिवादन करत नव्हते तर शिवसेनेला अभिवादन करत होते. आम्ही मोहम्मद अली रोडवरुन जात होतो. मुस्लीम समाज खाली उतरुन शिवसेनेच्या नावाने जयजयकार करत होता.” असं राऊत म्हणाले.

हेही वाचा : 

महाराष्ट्रातील उद्योग बाहेर नेऊन, पंतप्रधान मोदी राज्यातील युवकांचा रोजगार हिरावून घेत आहेत ; राहुल गांधींचा हल्ला

“मी मरण पत्करेन पण शरण जाणार नाही. गेल्या तीन महिन्यात शिवसेना फोडण्याचा आणि तोडण्याचा अनेकदा प्रयत्न केला. पण ही शिवसेना तुटली नाही. ही शिवसेना अभेद्य शिवसेना आहे, ही बुलंद शिवसेना आहे, हे अंधेरीच्या पोटनिवडणुकीतील विजयानं दाखवून दिलं आहे. आता मशाल भडकली आहे. आता महाराष्ट्रात केवळ एकच शिवसेना राहील ती शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची असेल” असंही राऊत यावेळी म्हणाले.

आता खोक्यांची बदनामी करत आहेत. महाराष्ट्रातील बोके खोक्यावर बसलेली आहेत. आता फक्त ओक्के शिवसेनाच. ती सुद्धा उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंची. गद्दारांना बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याचा अधिकार नाही, मुंबई महापालिका, मुंबई आपल्या हातातून काढण्यासाठी शिवसेना फोडलीय हे लक्षात घ्या. पण ते होणार नाही. असं संजय राऊत म्हणाले.

मी १०३ दिवस तुरुंगात राहिलो, आता आपले १०३ आमदार निवडून येतील, असे संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले. किशोरी पेडणेकर, सुषमा अंधारे यांच्यासारख्या शिवसेनेच्या नेत्यांना त्रास दिला जात आहे, असेही राऊत यांनी म्हटले.

हिवाळ्यात या भाजीचा समावेश करा, मधूमेहा सारख्या आजारांना दूर ठेवा

Latest Posts

Don't Miss