‘ना ना करते प्यार …’ Uddhav Thackeray यांची Devendra Fadnavis यांच्या भेटीनंतर मोठी प्रतिक्रिया

सर्व नेते सकाळपासून विधिमंडळात उपस्थिती लावत आहेत.यानंतर आज सकाळी शिवसेना उबाठाप्रमुख (Shivsena UBT) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची लिफ्टमध्ये भेट झाली.

‘ना ना करते प्यार …’ Uddhav Thackeray यांची Devendra Fadnavis यांच्या भेटीनंतर मोठी प्रतिक्रिया

आजपासून (२७ जून गुरुवार) महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Mansoon Session 2024) सुरु झाले आहे. सर्व नेते सकाळपासून विधिमंडळात उपस्थिती लावत आहेत.यानंतर आज सकाळी शिवसेना उबाठाप्रमुख (Shivsena UBT) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची लिफ्टमध्ये भेट झाली. या झालेल्या भेटीनंतर चर्चांना उधाण आले. म्हणून यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत घडलेली घटनांना दुजोरा दिला.

सकाळी विधानभवनात जात असताना देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली. दोघेही सोबतच लिफ्टमध्ये गेले. या प्रकरणानंतर चर्चांना उधाण आले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. ज्यात त्यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले. यावेळी त्यांना देवेंद्र फडणवीसांच्या भेटीबद्दल विचारण्यात आल्यानंतर ‘ती अनौपचारिक भेट झाली’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. यावेळी ते म्हणाले, ‘ आम्ही लिफ्टमध्ये एकत्र होतो. अनेकांना वाटलं असेल की ‘ना-ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे’… पण ती अनौपचारिक भेट झाली. काही चर्चा नाही. भिंतीला कान असतात, पण लिफ्टला नसतात. त्यामुळे पुढील चर्चा आम्ही लिफ्ट मध्ये करू.’ अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली.

संपूर्ण महाराष्ट्र या सरकारला ‘बाय बाय’ करत आहे.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, “या सरकारच निरोप घेण्याचं अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. संपूर्ण महाराष्ट्र या सरकारला बाय बाय म्हणत आहे. या अधिवेशनात सरकार कडून घोषणांचा पाऊस होण्याची शक्यता आहे. जो घोषणांचा पाऊस होईल तो गाजर संकल्प असेल. कारण निधी खर्चच होणार नाही. घोषणांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ होत आहे. सरकारला जरातरी संवेदना असतील तर घोषणांची अंमलबजावणी किती झाली हे सांगावे. केंद्र आणि राज्यातील यांची दोन्ही सरकारे महायुती सरकार नसून महागळती सरकार आहे. लिकेज सरकार आहे. कारण राम मंदिरसुद्धा लीक होत आहे आणि पेपर सुद्धा लीक होत आहेत. काही विषय त्यांच्यासमोर मांडले तर ते उलट आमच्यावर आरोप करतात. “

हे ही वाचा

महिलांसाठी खुशखबर ! राज्यात येणार ‘ही’ नवी योजना.. 

चोपडा बस स्थानकाने पटकावला स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाचा किताब..

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version