उद्धव ठाकरेंनी माझ्यासाठी मातोश्रीचे दरवाजे बंद केले, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली खंत

उद्धव ठाकरेंनी माझ्यासाठी मातोश्रीचे दरवाजे बंद केले, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली खंत

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाला प्रचंड वेग आला आहे. आज एबीपी माझाच्या वाहिनीवर ‘माझा महाराष्ट्र माझा व्हिजन’ असा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमध्ये सर्व पक्षाच्या नेत्यांना बोलवण्यात आलं आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अनेक मोठं वक्तव्य त्या ठिकाणी केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या आणि उद्धव ठाकेरंच्या मैत्री कटुता आलीये का? या प्रश्नावर त्यांनी भाष्य केलं. मातोश्रीचे (Matoshree) दरवाजे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीच माझ्यासाठी बंद केले. माझा फोनही त्यांनी घेतला नाही, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात बोलताना दिली.

तर पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाल, ठाकरे सरकारच्या काळात मला जेलमध्ये (Jail ) टाकण्याचं टार्गेट तत्कालीन सीपी संजय पांडे यांना दिलेलं, असं देवेंद्र फडणवीसांना सांगितलं. तसेच, पॉलिटिकल सरप्राईजेस देणारे फडणवीस आता आणखी काय सरप्राईज देणार का? फडणवीसांचा ‘प्लान ए’ अजित पवार (Ajit Pawar), ‘प्लान बी’ एकनाथ शिंदे (Eknath Shinde), आता ‘प्लान सी’ अशोक चव्हाण (Ashok Chavan) असणार का? या प्रश्नांचं उत्तरही फडणवीसांनी दिलं. या प्रश्नावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, २०२४ पर्यंतचे सगळी सरप्राईजेस संपली आहेत. आता २०२४ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी अनेक मोठे सरप्राईजेस तुम्हा सर्वांना निश्चितपणे देऊ. पण आतातरी प्लान A, B, C काहीच नाही. प्लान गव्हर्नन्स आहे. आम्हाला सध्या गव्हर्नन्सवर फोकस करायचाय. आम्हाला महाराष्ट्र जो मधल्या अडीच वर्षात थांबला होता. विकास होत नव्हता, तो महाराष्ट्र आम्हाला पुन्हा त्या ग्रोथ पाथवर आणायचाय. हेच आमचं ध्येय आहे.”

देवेंद्र फडणवीस यांना ज्यावेळी मातोश्री बाबत प्रश्न विचारलं असतांना ते म्हणाले. मातोश्रीचे दरवाजे त्यांनीच बंद केले आणि याचं मला दुःख आहे, असं म्हणत आपली खंत व्यक्त केली. तसेच, महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट तत्कालीन सीपी संजय पांडे यांना देण्यात आलं होतं, असा खळबळजनक गौप्यस्फोटही केला. पण तरीही वैयक्तिक आजही माझं वैर नाही. आजही त्यांच्यासोबत मी चहा पिऊ शकतो. त्यांच्याशी मी गप्पा मारु शकतो, असंही फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा:

Majha Maharashtra Majha Vision, देवेंद्र फडणवीसांनी केला मोठा गौप्यस्फोट, ‘मविआ सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव’

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार ‘झिम्मा २’

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version