उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केली टीका, ज्या हेलिकॉप्टरने गावाकडे जाता…

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज ८ सप्टेंबर रोजी अहमदनगर (Ahmednagar) मधील दुष्काळी परिसराची पाहणी करण्यासाठी गेले होते.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केली टीका, ज्या हेलिकॉप्टरने गावाकडे जाता…

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज ८ सप्टेंबर रोजी अहमदनगर (Ahmednagar) मधील दुष्काळी परिसराची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी कोपरगाव, संगमनेर (Sangamner) या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला. अनेक भागात पाण्याअभावी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर काहीठिकाणी पाण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या सगळ्याची सरकारने नुकसान भरपाई द्यावी असे सर्व शेतकरी बांधवांचे मत आहे. या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन शेकऱ्यांचे प्रश्न सरकार समोर मांडले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता टीका केली आहे. गावाकडच्या पंचतारांकित शेतीपेक्षा इथल्या मातीतल्या शेतीत एकदा भेट द्या, असं आवाहनच ठाकरे यांनी केले.

‘कोणीतरी सांगितलं की मुख्यमंत्री चार-चार दिवस झोपत नाहीत आणि मग आराम करण्यासाठी गावाकडे हेलिकॉप्टरने जातात, मात्र मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे की हेच हेलिकॉप्टर घेऊन जरा शेतकऱ्यांच्या बांधावरही फेरफटका मारून या, इथल्या साध्याभोळ्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घ्या, असे आवाहनच उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांनी यावेळी केलं. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले ‘ एकूणच महाराष्ट्र दुष्काळाच्या  उंबरठ्यावर आहे. आता काही भागात पाऊस पडत असला तरी हा पाऊस किती दिवस बरसणार आहे, हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. या पावसाने पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे, गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटू शकेल, पण दुबार पेरणी केलेल्या ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालंय, त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावीच लागणार आहे. अनेक पिकं करपून गेली आहेत. गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीची भरपाई देखील अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही, मग आता करपून गेलेल्या पिकांचे पंचनामे कधी होतील? नुकसान भरपाई कधी मिळेल? दरम्यान सरकारने एक रुपयात पिक विमा काढण्याचे शेतकऱ्यांना सांगितले, मात्र पिकांचे पंचनामे कधी करणार आणि शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले ‘ सरकार फक्त थापा मारण्याच काम करत आहेत. तिने तिघाडा आणि काम बिघाडा असे सरकार असून स्वतःचे कार्यक्रम जोरात चालू आहेत. जाहिराती जोरात करत आहेत. त्या जाहिरातींवर खर्च करण्यापेक्षा शेतकऱ्यांना हक्काचे पैसे सरकारने दिले पाहिजेत. पक्ष फोडायला यांच्याकडे पैसे आहेत, मात्र शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी यांना पैसे नाहीत, हे महाराष्ट्रातील भीषण वास्तव आहे. आराम करायला हेलिकॉप्टरने शेतात जात आहेत, त्यांनी या शेतकऱ्याकडे यावं, इथली परिस्थिती बघावी, काही काळ आपण वाट बघू पण त्यानंतर सरकारला जाब विचारवाच लागेल. त्यानंतरही मी या भागात अनेक दौरे करणार आहे. सध्या काही भागात पाऊस सुरू आहे. हा पाऊस असाच बरसत राहो, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटो अशी प्रार्थना साईचरणी करत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

हे ही वाचा: 

देवेंद्र फडणवीसांची निर्दोष मुक्तता

टोमॅटोच्या भावात मोठी घसरण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version