या लफग्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

या लफग्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

महापुरुषांच्या अवमानाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आज १७ डिसेंबर रोजी (Mahavikas Aghadi) ‘महामोर्चा’ (Mahamorcha) काढला होता. मुंबईच्या भायखळा इथल्या रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनीपासून या महामोर्चाची सुरुवात झाली. हळूहळू हा मोर्चा सीएसएमटी स्टेशनच्या समोर टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीच्या दिशेने पुढे सरकत राहिला. महापुरुषांच्या अवमानाच्या निषेधार्थ महाविकास आघाडी ‘महामोर्चा’ काढला आणि यात ठाकरेंचं संपूर्ण कुटुंब उपस्थित राहिले होते. या मोर्च्याच्या अंतिम सभेच्या वेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषण केलं आणि आपल्या भाषणातून राज्य सरकारला खडेबोल सुनावले.

हेही वाचा : 

संजय राऊतांनी केला हल्लाबोल, सरकार उलथून टाकण्यासाठी टाकलेलं हे पहिलं पाऊल

उद्धव ठाकरे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या भगतसिंह कोश्यारींना मी राज्यपाल मानत नाही. भाजपमधील नेत्यांना बौधिक दारिद्र्य आलं आहे. या लफग्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, मुंबईतली मोर्चाच्या गर्दीने सत्ताधाऱ्यांचे डोळे उघडायला हवे. मात्र जर यांचे डोळे उघडले नाही, तर ते कधीच उघडून नये, असंही उद्धव म्हणाले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुंबईच पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावरही हल्लाबोल केला. ते म्हणाले की, लोढा यांनी गद्दारांच्या बंडाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेशी केल्याने उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.

‘Kuttey’ सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज

मविआ नेत्यांची मागणी

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांच्या वक्तव्याचा विरोधकांनी कडाडून विरोध केला. कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी केली.ही या मोर्चातील आग्रही मागणी आहे. शिवाय महापुरूषांचा अवमान करणाऱ्या नेत्यांनी महाराष्ट्राची मागणी करावी, अशीही मागणी महाविकास आघाडीची आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद सध्या ऐरणीवर आहे. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपली भूमिका स्पष्ट करत नाहीत. हाही मुद्दा या महामोर्चात आहे. शिंदेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मविआची मागणी आहे.

महाविकास आघाडीच्या हल्लाबोल मोर्चाला आरंभ Mahavikas Aghadi Mahamorcha

Exit mobile version