Dasara Melava : उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या स्टाईल मध्ये भाषण करणार का?, ठाकरे प्लॅन बी मोडवर

Dasara Melava : उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या स्टाईल मध्ये भाषण करणार का?, ठाकरे प्लॅन बी मोडवर

दसरा मेळाव्याला अजूनही परवानगी मिळाली नसल्यामुळे आता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्लॅन बी ची तयारी केली आहे. गेल्या अनेक वर्षांची बाळासाहेब ठाकरेंची परंपरा उद्धव ठाकरेंनी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार आणि त्यासाठी शिवसेनेने प्लॅन रेडी केला आहे. आता फक्त उद्धव ठाकरेंचा आवाज शिवतीर्थवरच घुमणार अशीच शक्यता निर्माण झाली आहे. कारण शिंदे गटाला बीकेसी मैदानाची परवानगी मिळालीय तर दुसरीकडे शिवतीर्थाचा निकाल अद्याप बाकी आहे. पण, दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच करायचा हा दावा उद्धव ठाकरेंनी केला आहे. यामुळेच शिवसैनिकांनी दस-याच्या दिवशी शिवतीर्थावर जमण्याचे आदेश दिले आहेत. परंतु बिनापरवानगी अशी सभा करायची झालं तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि असे झाल्यास शिंदे विरुद्ध ठाकरे असा राडा होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : 

Queen Elizabeth Funeral : राजघराण्यातील लोकांना अंतिम संस्कार कसे केलं जाते ?

शिवसेनेनं शिवतीर्थ आणि बीकेसीची जागा मेळाव्यासाठी मिळावी यासाठी अर्ज केला आहे. आणि शिवसेना कोणाची हा प्रश्न प्रलबिंत आहेत त्यामुळे पालिका हे मैदान राखीव ठेऊ शकते. परंतु परवनगी न मिळाल्यास शिवसैनिकांना शिवाजी पार्कवर जमण्याचे आदेश दिले गेले आहेत. शिवसैनिक शिवाजी पार्कवरच्या स्मृती स्थळ किंवा शिवसेना भवनाच्या चौकात सर्व जमा होतील. बाळासाहेब ठाकरेंनी पहिल्या दसरा मेळाव्यात टॅक्सीवर उभं राहून भाषण केलं होतं तस उद्धव ठाकरे चौकात उभे राहून भाषण करतील ? असा प्रश्न या ठिकाणी उभा राहतो. महापालिकेच्या निकालानंतर ते कोर्टाच्या माध्यमातून परवानगी घेण्याचा प्रयत्न करतील जर परवानगी नाही मिळाली तर गर्दी जमवून थेट गर्दीतूनच भाषण करणार असे सांगण्यात आले आहे.

World Wrestling Championship : कुस्तीपटू बजरंग पुनियानं जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक पटकावले

शिवसेना आणि शिवाजी पार्क मैदानावरील दसरा मेळावा हे समीकरण आहे. परंतु शिवसेनेतील आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे यंदा शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात मेळाव्यासाठी चुरस निर्माण झाली. शिवाजी पार्क मैदान मिळावं यासाठी शिवसेनेबरोबरच शिंदे गटानेही अर्ज केला आहे. मात्र शिवतीर्थ कोणाला मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण, मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदान मिळावं याकरता शिंदे गटाने केलेला अर्ज ‘एमएमआरडीएने स्वीकारला आहे. तर शिवसेनेने ज्या मैदानासाठी अर्ज केला ते आरक्षित असल्याने फेटाळण्यात आलं आहे. त्यामुळे शिवाजी पार्क दोन्ही गटांना नाकारल्यास शिंदे गटाला बीकेसीचा पर्याय उपलब्ध असेल, हे स्पष्ट झालं आहे.

खा.संजय राऊतांचा गरबा तुरुंगातच, न्यायालयाच्या ‘या’ निर्णयनाने शिवसेनेला धक्का

Exit mobile version