उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा देत मारला टोला

उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा देत मारला टोला

गुजरात विधानसभा निवडणुकीत (Gujarat Assembly Election ) भाजपचा (Bjp) दणदणीत विजय झालाय. भाजपच्या या विजयाबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. गुजरातचा विजय विक्रमी आणि ऐतिहासिक असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. “गुजरात निवडणूक पुन्हा एकदा मोदींच्या नेतृत्वात लढवण्यात आली, त्यामुळे जनतेनं भाजपाला भरघोस मतदान केलं,” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. गुजरातसह हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) विधान सभा निवडणुकीचा देखील निकाल लागलाय. तेथे काँग्रेसचा दणदणीत विजय झालाय. तर काल झालेल्या मतमोजणीत दिल्ली ‘मनपा’मध्ये अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या ‘आप’ने भाजपवर (BJP) मात करत सत्ता खेचून आणली आहे.

उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा देताना भाजपला टोला देखील लगावला आहे. “या विजयात महाराष्ट्रातून पळवलेले मोठे उद्योगही फळले असावेत असे दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ तारखेला महाराष्ट्रात येत आहेत. मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते इथेही भरघोस घोषणा करतील अशी अपेक्षा,” असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. आपने गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात मतविभागणी करुन भाजपाचा फायदा घडवून आणला हे स्पष्ट आहे. ज्यांचं त्यांचं राजकारण सोयीनुसार चालत असतं, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभेचा निकाल जाहीर झाला. आता महाराष्ट्रातील निवडणुका लावा, आता घाबरायची काय गरज आहे? मुंबईसह अनेक पालिकांच्या निवडणुका बाकी आहेत. एकदा लोकशाही पद्धतीने होवून जावू द्या. जे विजयी झाले त्यांचे मनापासून अभिनंदन करतो, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी भाजपला शुभेच्छा दिल्या आहेत. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले, “आता वेळ आलीय ती राज्यातील निवडणुकांची. राज्यात एक घटनाबाह्य सरकार बसले आहे. ४० आमदार, १२ खासदारांच्या निवडणुका व्हायला हव्या होत्या. त्या अजून झालेल्या नाहीत. आता एवढा मोठा विजय प्राप्त झाल्यावर महाराष्ट्रातील निवडणुका घ्यायला काहीच हरकत नाही.

हे ही वाचा : 

संसदेत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलतांना, खासदार अमोल कोल्हे त्यांचा माईक केला बंद

गुजरात निकाल लागला म्हणजे देशात लोकांचा एका बाजूने मतप्रवाह जातो हे म्हणणे उचित नाही – शरद पवार

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version