spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पोलीस प्रशासच्या विरोधात ठाकरे गटाचे नवी मुंबई येथे आंदोलन, पोलीस आयुक्तालयावर धडक मोर्चा

नवी मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने मोर्चा एक आयोजित करण्यात आलेला आहे. ठाकरे गटाचे नेते आणि कार्यकर्त्यांवर होणाऱ्या कारवाईच्या निषेधार्थ हा मोर्चा आयोजित केल्या असलयाचे सांगितले. आज सकाळी नवी मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. परंतु ह्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तरीही ठाकरे गटाचे नेते व कार्यकर्ते मोर्चा काढण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. या मोर्चासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार तसेच अनेक कार्यकर्ते नवी मुंबईत पोहोचले आहेत. आजूबाजूच्या जिल्ह्यातले कार्यकर्तेही या मोर्चासाठी दाखल झाले आहेत. ठाकरे गटाचे नेते आणि कार्यकर्त्यांवर होणाऱ्या कारवाईच्या निषेधार्थ हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.

हेही वाचा : 

निवडणूक अंधेरीत, पण प्रचार संपूर्ण मुंबईत; पक्षाने लढवली अनोखी युक्ती

सरकारला राज्यातून तडीपार करण्याची वेळ, अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया

खासदार विनायक विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार मनिषा कायंदे, विधानसभेचे गटनेते अजय चौधरी मोर्चासाठी नवी मुंबईत पोहोचले आहेत. ज्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे आहेत त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला म्हणून आता ते वाल्याचे वाल्मिकी झाले का, असा सवाल ठाकरे गटाच्या नेत्यांनी विचारला आहे. आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांवर जाणीवपूर्वक गुन्हे नवी मुंबई पोलीस करत आहेत त्यासाठी आम्ही हा तडीपार मोर्चा आयोजित केला आहे
भास्कर जाधव यांच्या घरावर काल हल्ला करण्यात आलेला आहे आम्ही याचा निषेध करतो. सध्या खुनशी राजकारण पाहायला मिळत आहे. आता राज्यभरातूनच या सरकारला तडीपार करण्याची वेळ आलेली आहे लवकरच आम्ही या सर्वांना तडीपार करु, असं अंबादास दानवे म्हणाले.

T20 World Cup : आज टीम इंडियाचा न्यूझीलंडविरुद्ध सामना सांगणार, संघातील उणीवा दूर करण्याची शेवटची संधी

Latest Posts

Don't Miss